Mithun Chakraborty Net Worth: हॉटेल चेनचे मालक आहेत मिथुन चक्रवर्ती, पाहा अभिनेत्याची एकूण संपत्ती किती…

लिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आजही लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. मिथुन यांनी स्वकष्टाने मनोरंजन विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई करणारे मिथुन चक्रवर्ती यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

Mithun Chakraborty Net Worth: हॉटेल चेनचे मालक आहेत मिथुन चक्रवर्ती, पाहा अभिनेत्याची एकूण संपत्ती किती...
मिथुन चक्रवर्ती
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 8:56 AM

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आजही लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. मिथुन यांनी स्वकष्टाने मनोरंजन विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई करणारे मिथुन चक्रवर्ती यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मिथुन यांनी आपल्या कारकीर्दीत सुमारे 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे (Disco Dancer fame Actor Mithun Chakraborty Net Worth).

मिथुन चक्रवर्तीने आपल्या करिअरची सुरुवात ‘मृगया’ या चित्रपटाने केली होती. मिथुन यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर मिथुनने आयुष्यात कधीही मागे वळून पाहिले नाही. आजच्या घडीला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.

मिथुन यांची एकूण संपत्ती

नुकतेच मिथुन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, यावेळी त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली. या अहवालानुसार, मिथुन चक्रवर्ती यांची एकूण मालमत्ता सुमारे 40 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, ती जर भारतीय चलनात मोजली गेली तर, सुमारे 292 कोटी रुपये इतकी आहे .

मिथुन यांच्या गाड्या आणि घरे

मिथुन यांची वेगवेगळ्या ठिकाणी घरे आहेत. या अभिनेत्याची मुंबई, ऊटी इत्यादी ठिकाणी बरीच घरे आहेत. याशिवाय, मिथुन चक्रवर्ती यांना लक्झरी वाहनेही खूप आवडतात. रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्याकडे मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन, फोर्ड एंडेव्हूयर, टोयोटा फॉर्च्यूनर सारख्या लक्झरी गाड्या आहेत.

हॉटेल चेनचे मालक!

मिथुन चक्रवर्ती यांची स्वतःची हॉटेल्स देखील आहेत. मिथुन ग्रुप ऑफ हॉटेल्स मोनार्कच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, अभिनेत्याकडे ऊटी, म्हैसूर इत्यादी ठिकाणी हॉटेल देखील आहेत. अभिनेत्याची ही हॉटेल्स लक्झरी आहेत. ज्यामध्ये ओपन एअर मल्टीक्युझिन रेस्टॉरंट्स, तसेच स्विमिंग पूल, पूल टेबल आणि ट्रॅव्हल संबंधित सगळ्या सुविधा आहेत.

मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी मिथुन चक्रवर्ती नक्षलवादी होते. मिथुन हे मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट देखील आहेत. असं म्हणतात की, मिथुन यांनी स्वत:च बर्‍याच चित्रपटांमध्ये स्टंट केले होते. मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये काम करणार्‍या मिथुन यांना खरी ओळख ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटापासून मिळाली. या चित्रपटाने अभिनेत्याला रातोरात स्टार बनवले. या चित्रपटानंतर त्यांना ;डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. चित्रपटांपासून दूर जात आता मिथुन चक्रवर्ती यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

(Disco Dancer fame Actor Mithun Chakraborty Net Worth)

हेही वाचा :

Toofan Trailer Review | फरहानचा दमदार ‘अज्जू भाई’, परेश रावलही कोचच्या भूमिकेत अव्वल! पाहा ‘तूफान’चा ट्रेलर

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत अफेअर आहे का? पूजा बेदीची मुलगी म्हणते, “आम्ही तर…”

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.