AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zee comedy show : फराह खानच्या तावडीतून जुही चावलाही सुटली नाही, व्यवस्थित डान्स न केल्यास धपाटा पडायचाच; जुहीनेच सांगितला मजेदार किस्सा

जुही या वीकेंडला शोची विशेष गेस्ट म्हणून दिसली, तर फराह खान शोमध्ये 'लाफिंग बुद्धा' ची भूमिका साकारताना दिसली. दरम्यान, जुही चावलाने तिच्या चित्रपटांच्या सेटवर नृत्यदिग्दर्शक-चित्रपट निर्माती फराह खान कशी कानशिलात लावायची. (Even Juhi Chawla has not escaped from the clutches of Farah Khan. Funny story told by Juhi)

Zee comedy show : फराह खानच्या तावडीतून जुही चावलाही सुटली नाही, व्यवस्थित डान्स न केल्यास धपाटा पडायचाच; जुहीनेच सांगितला मजेदार किस्सा
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 8:09 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawala) आणि इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर फराह खान (Farah Khan) अलीकडेच ‘झी कॉमेडी शो’मध्ये (Zee Comedy Show) दिसल्या. जुही या वीकेंडला शोची विशेष गेस्ट म्हणून दिसली, तर फराह खान शोमध्ये ‘लाफिंग बुद्धा’ ची भूमिका साकारताना दिसली. दरम्यान, जुही चावलाने तिच्या चित्रपटांच्या सेटवर नृत्यदिग्दर्शक-चित्रपट निर्मात्या फराह खान कशी कानशिलात लावायची. त्यामुळे प्रत्येकजण फराहला कसा घाबरत होता याची आठवण करून दिली.

शोमध्ये जुही म्हणाली, “मी याआधी झी कॉमेडी शो पाहिले आहेत आणि फराहने सर्व कॉमेडियनना खूप प्रेमाने रागवते, पण जेव्हा आम्ही तिच्यासोबत काम करायचो, तेव्हा आम्हाला जवळजवळ दररोज ती कानशिलात लावायची. ” ती पुढे म्हणाली, “कधीकधी ती सेटवर यायची आणि प्रत्येकजण खूप मेहनत आणि तालीम करताना तिचा दिसायचे, पण तिला कदाचित आम्ही काय करत होतो ते आवडत नव्हतं, म्हणून ती संपूर्ण युनिटसमोर माईक घेऊन ओरडायची, ‘काय हे काय आहे? तुम्ही काय करत आहात? ‘आम्ही तिला फार घाबराचो.”

फराहने जुहीच्या डान्सचं केलं कौतुक

जुहीचे शब्द ऐकून सेटवर उपस्थित असलेले सगळे हसायला लागले. त्याच वेळी, जुहीच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देताना फराहनं म्हटलं की, “त्यावेळी ही लोक खरोखरच वाईट डान्स करत होते, ते काहीही करायचे, परंतु आम्ही एकत्र अनेक उत्तम गाणी केली आहेत आणि आम्हाला खूप मजा देखील आली आहे. जुही माझ्या ओळखीच्या सर्वात प्रतिभावान अभिनेत्री आणि नृत्यांगनांपैकी एक आहे आणि तिच्यासोबत काम करताना मला खूप छान वेळ मिळाला. ”

जुही चावला जय मेहताला कशी भेटली?

एवढंच नाही तर शोच्या दरम्यान जूही चावला पती जय मेहतासोबतच्या पहिल्या भेटीबद्दल बोलली. शोमध्ये कॉमेडियन गौरव दुबेनं जुही चावलाच्या ‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘मुंबई से गई पूना, पूना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना…’ गायलं. या गाण्याच्या दरम्यान गौरव जुहीला विचारतो की जर गुजरात मध्यभागी कुठेच आलं नाही, तर तू आणि जय मेहता कसे भेटले? गौरवच्या या प्रकरणावर, जुही मजेदार पद्धतीने म्हणते की तिला जय चुकून भेटला. जुहीच्या या गोष्टी ऐकून तिथं उपस्थित असलेले सगळेच खळखळून हसले.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by ZEE TV (@zeetv)

संबंधित बातम्या

Global Citizen Live Event : प्रियांका चोप्राने शो केला होस्ट, आयफेल टॉवरसमोर निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिल्या पोज

Daughter’s Day 2021 : आंतरराष्ट्रीय कन्या दिवस, बापलेकीच्या नात्यावरील हे बॉलिवूड सिनेमे पाहाच

Suhana Khan: दिल, दोस्ती, दुनियादारी… मैत्रिणींसोबत ‘सुहाना’ सफर; पाहा सुहाना खानचा शॉर्ट ड्रेसमध्ये नाइट आऊट

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.