पुन्हा जन्म घेईन, आता कोरोनाशी झुंज हरलो, अभिनेत्याची फेसबुक पोस्ट, दुसऱ्याच दिवशी मृत्यू

35 वर्षीय अभिनेता राहुल व्होरा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंजत होता. (Actor Rahul Vohra Dies of COVID)

पुन्हा जन्म घेईन, आता कोरोनाशी झुंज हरलो, अभिनेत्याची फेसबुक पोस्ट, दुसऱ्याच दिवशी मृत्यू
Actor Rahul Vohra
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 4:00 PM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल व्होरा (Rahul Vohra) याचे कोरोना संसर्गानंतर रविवारी निधन झाले. पुन्हा जन्म घेऊन चांगलं काम करेन, आता हिंमत हरलो आहे, अशा आशयाची पोस्ट राहुलने शनिवारीच फेसबुकवर केली होती. दुसऱ्याच दिवशी तो आयुष्याशी झुंजही हरला. दिग्दर्शक आणि थिएटर गुरु अरविंद गौड यांनी सोशल मीडियावरुन राहुलच्या निधनाचं वृत्त दिलं. (Famous Actor Rahul Vohra Dies of COVID hours after seeking help on Facebook)

35 वर्षीय राहुल व्होरा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंजत होता. तो सातत्याने फेसबुकवरुन मदत मागत होता. मात्र वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्याचं निधन झाल्याचं बोललं जात आहे.

राहुल व्होरा मूळ उत्तराखंडचा होता. थिएटरमध्ये काम केल्यानंतर तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत होता. त्याने अनेक वेब सीरीजमध्येही काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला कोरोना संसर्ग झाला होता.

काय होती फेसबुक पोस्ट?

‘मलाही उपचार मिळाले असते, तर मीही वाचलो असतो’ असं लिहून राहुलने फेसबुकवर स्वतःचे डिटेल्स शेअर केले होते. ‘पुन्हा लवकरच जन्म घेईन आणि चांगलं काम करेन. आता हिंमत हरलोय’ असं राहुलने फेसबुकवर लिहिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना त्याने टॅगही केलं होतं.

Mujhe bhi treatment acha mil jata, To main bhi bach jata tumhaara Irahul Vohra

Name-Rahul Vohra Age -35(Famous Actor Rahul Vohra Dies of COVID hours after seeking help on Facebook) Hospital name…

Posted by Irahul Vohra on Saturday, 8 May 2021

“मला कोव्हिड संसर्ग होऊन चार दिवस झालेत, मी रुग्णालयात दाखल आहे, पण रिकव्हरी झालेली नाही. ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे. कुठे ऑक्सिजन बेड मिळेल का?” अशी पोस्टही त्याने 4 मे रोजी केली होती. मात्र मनाने हरलेल्या राहुलची कोरोनाशी झुंजही अपेशी ठरली.

संबंधित बातम्या :

कोरोनाने आणखी एक गुणी अभिनेता हिरावला, बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन

शेवटचे गुड मॉर्निंग, कोरोनाने निधनापूर्वी मुंबईतील महिला डॉक्टरची फेसबुक पोस्ट

(Famous Actor Rahul Vohra Dies of COVID hours after seeking help on Facebook)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.