चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना कोरोनाची लागण, प्रकृती खालावल्याने व्हेंटिलेटर सपोर्ट

गेल्या 20 वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय असणारे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक राजीव मसंद (Rajiv Masand)  यांची प्रकृती सध्या अतिशय गंभीर आहे. कोरोनानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना कोरोनाची लागण, प्रकृती खालावल्याने व्हेंटिलेटर सपोर्ट
राजीव मसंद
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 2:11 PM

मुंबई : गेल्या 20 वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय असणारे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक राजीव मसंद (Rajiv Masand) यांची प्रकृती सध्या अतिशय गंभीर आहे. कोरोनानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, कारण आयसीयूमध्ये ठेवल्यानंतरही त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग वाढला होता (Film Critic Rajiv Masand on ventilator after corona infection).

त्यांची प्रकृती विषयी डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. राजीव मसंद यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी पत्रकारिता सोडण्याचा निर्णय घेत, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती.

पाहा ट्विट :

करण जोहरच्या कंपनीचे सीओओ

करण जोहरच्या ‘धर्मा’मध्ये ते सीओओ म्हणून काम करत होते आणि चित्रपटांची व्यवस्था पाहत होते. धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी म्हणजेच डीसीए या नवीन कंपनीतही त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती, जिथे ते नवीन टॅलेंट लाँच करण्याचे काम करत होते. अलीकडेच डीसीएने चित्रपटांमध्ये अनेक नवीन चेहरे लाँच करण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला होता, तृप्ती डिमरीपासून अनेक नवीन कलाकारांना चित्रपटांमध्ये भूमिका देण्याची घोषणा केली होती     .

राजीव मसंद फारसे वयस्कर देखील नाहीत, ते 42 वर्षांचे आहेत आणि त्यांनी अगदी लहान वयातच चित्रपट पत्रकारितेत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांची कठोर परिश्रम पाहून लवकरच त्यांना संपादक करण्यात आले. त्यांनी आपला ‘मसंद की पसंद’ हा  कार्यक्रम सुरू केला होता. ज्यामध्ये तो चित्रपटांचे समीक्षण करत असत आणि त्यांचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. आपल्या शैलीने लवकरच त्यांनी चित्रपट जगातील अव्वल समीक्षकाचा दर्जा प्राप्त केला (Film Critic Rajiv Masand on ventilator after corona infection).

सर्वात चर्चित फिल्म समीक्षक

कदाचित बॉलिवूडचा असा कोणीही स्टार असेल ज्याने राजीव मसंद यांना मुलाखत दिली नसेल. राजीवच्या मुलाखतीत हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बर्‍याच गोष्टी सांगत असत. चित्रपट जगताच्या नेटवर्कशी जोडलेली जवळजवळ प्रत्येक व्यक्ती राजीवला ओळखते. राजीवच्या प्रकृतीची बातमी ऐकताच सर्वांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली.

राजीव यांच्या मोठ्या मुलाखती

चित्रपट पत्रकारांमध्ये राजीव मसंद हे एकमेव असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांच्या या शोच्या लोकप्रियतेमुळे, त्यांना नेटफ्लिक्सवर मुलाखत शो करण्याची ऑफर मिळाली, पण राजीव करण जोहरच्या कंपनीत सामील झाले. राजीवच्या शो राउंड टेबलमध्ये बॉलिवूड स्टार्स आपली मत मांडत असत. राजीव आधी चॅनेलसाठी काम करायचे पण नंतर त्यांनी आपले यूट्यूब चॅनलही सुरू केले. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग या जवळपास प्रत्येक बड्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

(Film Critic Rajiv Masand on ventilator after corona infection)

हेही वाचा :

‘बिग बॉस’ स्पर्धक अभिनेत्रीच्या मनात यायचे आत्महत्येचे विचार, ‘अशा’प्रकारे केली नैराश्यावर मात!

TMKOC | ‘तारक मेहता’च्या चाहत्यांना वाट बघावी लागणार? ‘दया बेन’च्या वापसीवर प्रश्न विचारताच असित मोदी म्हणाले…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.