भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड, मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार
लता मंगेशकर नावाचं पर्व आज संपलं. त्यांच्या जाण्याने आज भारत पोरका झाला. मात्र त्यांचा आवाज कायम या जगात राहिल. दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लतादिदींवर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : आपल्या सुमधूर आवाजाने गेली ६० वर्षे रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँन्डी (Breech candy hospital mumbai) रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना कोरोना झाला होता. त्यानंतर त्.सुरुवातीचे काही दिवस त्या उपचारांना प्रतिसाद देत होत्या. पण वयोमानानुसार नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांना वाचविण्यासाठी ब्रीड कँडीच्या डॉक्टरांच्या चमूने प्रयत्नांचीा पराकष्ठा केली. पण शेवटी देवालाही लतादिदींचा गोड, अवीट सूर ऐकायचा असावा. आज लतादिदी जग सोडून निघून गेल्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी, संगीतसृष्टी आणि अवघा भारत पोरका झाला आहे. त्यांच्या निधनाने भारताचं रत्न गेल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी 5.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार
लता मंगेशकर नावाचं पर्व आज संपलं. त्यांच्या जाण्याने आज भारत पोरका झाला. मात्र त्यांचा आवाज कायम या जगात राहिल. दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लतादिदींवर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
महिनाभर रुग्णालयात उपचार सुरु होते पण…
वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांना कोरोना झाला. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत त्या कोरोनापासून सुरक्षित राहिल्या. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाने गाठलंच. कोरोना कुठे बरा होत नाही तोपर्यंत त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला. दीदी कधी उपचारांना प्रतिसाद देत होत्या तर कधी वयोमानानुसार त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. ब्रीच कँडीचे डॉक्टर वारंवार प्रसिद्धी माध्यमांसमोर त्यांच्या तब्येतीचे अपडेट देत होते. काल लतादीदींची तब्येत खालावल्याची बातमी समोर आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीने ब्रीड कँन्डी हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. नंतर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीदेखील दीदींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. रात्री अनेक नेत्यांनी ब्रीड कॅंडी रुग्णालयात फोन केले. पण आज अखेर त्यांनी जग सोडलं. २८ दिवसांचा संघर्ष आज संपला. त्यांच्या स्वरमैफलीने आज अखेरची भैरवी घेतली.
गेली २८ दिवस त्या मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात होत्या. कधी तब्येतीत सुधारणा झाल्याच्या तर कधी तब्येत खाल्यावल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर काल त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची बातमी आली. तेव्हाच संपूर्ण भारताच्या मनात धस्स झालं होतं. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ६० वर्ष त्यांच्या आवाजाची रसिक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ होती. ३५ भाषांतील ३० हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली. गायनविश्वातील प्रत्येक जण त्यांना गानसरस्वती मानत होता.
संबंधित बातम्या