Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’साठी संजय लीला भन्साळी घेणार मोठा निर्णय, आलिया भट्ट स्विकारणार हा बदल?

(Gangubai Kathiawadi: Sanjay Leela Bhansali will take a big decision for 'Gangubai Kathiawadi', will Alia Bhatt accept this change?)

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’साठी संजय लीला भन्साळी घेणार मोठा निर्णय, आलिया भट्ट स्विकारणार हा बदल?
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 12:17 PM

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. संजय लीला भन्साळी. (Sanjay Leela Bhansali) यांनासुद्धा आपल्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटासोठी आता मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. कोरोनामुळे संजय लीला भन्साळी मोठा निर्णय घेत ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करू शकतात अशी चर्चा आहे. हा चित्रपट 30 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता मात्र महाराष्ट्रात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे त्यामुळे त्यांना हा मोठा निर्णय घ्यावा लागणार असल्याचीही चर्चा आहे.

चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणार ?

संजय लीला भन्साळी यांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करायचा होता, मात्र परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्यांना ओटीटीचा सहारा घ्यावा लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता अनेक निर्मात्यांनी चित्रपट रिलीजची तारीख पुढे ढकलली आहे, त्यात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटाचाही समावेश आहे. आता भन्साळी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणार की परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होईल, हे संजय लीला भंन्साळी स्वतःच सांगू शकतील.

चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करायला आलिया होणार तयार ?

गंगूबाई काठियावाडीमध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात ती गंगूबाईची व्यक्तिरेखा साकारणार आहे. काही आठवड्यांपूर्वी आलियाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती ज्यामुळे तिला चित्रपटाचं शूटिंग थांबवावं लागलं. आता बरी झाल्यानंतर ती लवकरच चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करणार आहे. पण ती तिचा हा चित्रपट ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार असेल का? कारण या चित्रपटाच्या थिएटर रिलीजबद्दल ती उत्साही होती.

माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर चित्रपट

हा चित्रपट हुसेन जैदी (Hussain Zaidi) यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे. हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात असे सांगितले गेले आहे की, गांगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गांगुबाई ह्या तिच्या पतीकडून केवळ 500 रुपयांत विकली होती. त्यानंतर ती वेश्या व्यवसायात गुंतली. यावेळी तिने अनेक मुलींच्या उन्नतीसाठी काम केले.

संबंधित बातम्या

Birth Anniversary: मोठ्या पडद्यावरील कजाग सासू, प्रेमळ आई… एक होत्या ललिता पवार; वाचा संपूर्ण प्रवास

Tanhaji : मनोरंजनाचा डबल धमाका, ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ आता मराठीतही

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.