Emraan Hashmi | जम्मूच्या पहलगाममध्ये इमरान हाश्मीवर दगडफेक, वाचा नेमके काय घडले?

इमरान हाश्मी चित्रपटाचे शूटिंग पुर्ण करून पहलगामच्या बाजारपेठेत फिरत असताना अचानक काही युवकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Emraan Hashmi | जम्मूच्या पहलगाममध्ये इमरान हाश्मीवर दगडफेक, वाचा नेमके काय घडले?
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 9:25 AM

मुंबई : बाॅलिवूडचा प्रसिध्द अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करतोय. मात्र, शूटिंग संपल्यानंतर बाजारपेठेत फिरत असताना काही युवकांनी इमरान हाश्मीवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. इमरान हाश्मी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाची शूटिंग करतोय. गेल्या काही दिवसांपासून इमरान जम्मू-काश्मीरमध्येच आहे. ग्राउंड झिरो (Ground Zero) चित्रपटात इमरान हाश्मी एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहेत.

पहलगाममध्ये इमरान हाश्मीवर दगडफेक

इमरान हाश्मी चित्रपटाचे शूटिंग पुर्ण करून पहलगामच्या बाजारपेठेत फिरत असताना अचानक काही युवकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यावेळी इमरान हाश्मीसोबत चित्रपटाचे निर्माते आणि इतरही कलाकार होते. आता यासर्व प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध कलम 147, 148, 370, 336, 323 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. माहिती अशीही मिळत आहे की, पोलिसांनी दगडफेक प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यातही घेतले असून चाैकशी सुरू आहे.

ग्राउंड झिरो चित्रपटाचे शूटिंग जम्मूमध्ये सुरू…

इमरान हाश्मीचा ग्राउंड झिरो हा चित्रपट सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानावर आधारित आहे. याआधी चित्रपटाचे शूटिंग श्रीनगरमध्ये झाले होते. विशेष म्हणजे यापूर्वी इमरान हाश्मी 14 दिवस श्रीनगरमध्ये होता. पुढील काही दिवस ग्राउंड झिरो चित्रपटाचे शूटिंग कश्मीर येथे सुरू राहणार आहे. काही बातम्या अशा आल्या होत्या की, चित्रपटाच्या सेटवर दगडफेक करण्यात आलीये. मात्र, बाजारपेठेत फिरायला गेल्यावर ही दगडफेक करण्यात आलीये.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.