Happy Birthday Ajay Devgn | बिग बींच्या घरासमोर दाखवायचा स्टंट, आता बॉलिवूडच’सिंघम’ म्हणून ओळखला जातोय अजय देवगण!

अजय मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यापूर्वीच स्टंट्स दाखवू लागला होता. एक काळ असा होता की, जेव्हा अजय देवगण, अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या समोरील रस्त्यावर बरेच स्टंट करून दाखवायचा.

Happy Birthday Ajay Devgn | बिग बींच्या घरासमोर दाखवायचा स्टंट, आता बॉलिवूडच’सिंघम’ म्हणून ओळखला जातोय अजय देवगण!
अजय देवगण
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 11:43 AM

मुंबई : ‘दिलवाले’ ते ‘तान्हाजी’पर्यंत एखाद-दुसरा चित्रपट असा असेल, ज्यात अजय देवगण (Ajay Devgn) धोकादायक स्टंट करताना दिसला नसेल! म्हणजेच, स्टंट आणि अजय हे समीकरण तसे जुनेच आहे. चित्रपटातील स्टंटवर अजयचे खूप प्रेम आहे. ही देणगी आणि हा धाडसीवृत्ती अजयला ‘वारसा’ म्हणून मिळाली आहे. वास्तविक अजय देवगणचे वडील वीरू देवगण हे भारतीय चित्रपटसृष्टीचे स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर होते (Happy Birthday Ajay Devgn knoe the story of Ajay devgn Nukkad gang).

अजय मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यापूर्वीच स्टंट्स दाखवू लागला होता. एक काळ असा होता की, जेव्हा अजय देवगण, अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या समोरील रस्त्यावर बरेच स्टंट करून दाखवायचा. एवढेच नाही तर, त्यांने तिथे एक गँग देखील बनवली होती. ज्याचा पुढारी अजय देवगण होता

एका मुलाखतीत सांगितला किस्सा

एका चॅट शोमध्ये दिलेल्या मुलाखती अजय देवगन आणि अभिषेक बच्चन यांनी स्वतः या किस्स्याबद्दल सांगितले होते. अभिषेकच्या म्हणण्यानुसार, अजय त्यावेळी महाविद्यालयात होता, पण तेव्हा त्याच्याकडे खुली जीप होती, ज्यावर तो प्रतीक्षाच्या समोरील चौकात बरेच स्टंट करायचा. तसेच, तिथे त्याची 3-4 लोकांची टोळी देखील असायची, जी ‘नुक्कड गँग’ म्हणून ओळखली जात असे. अजय त्या टोळीचे नेतृत्व करायचा.’

अभिषेकनेही ट्राय केल स्टंट

अभिषेक बच्चन हा किस्सा सांगताना पुढे म्हणाला की, ‘जेव्हा अजय देवगण चित्रपटांमध्ये काम करू लागला, तेव्हा त्याचे रस्त्यावरचे स्टंट कमी झाले. मात्र, पुढे ही नुक्कड टोळी अभिषेक बच्चन, गोल्डी बहल आणि हृतिक रोशन यांनी चालवण्याचा प्रयत्न केला. अजय देवगण प्रमाणे त्या सर्वांनीही जबरदस्त स्टंट करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी त्याला बर्‍यापैकी दुखापत झाली. शेवटी त्यांनी हा नाद सोडला (Happy Birthday Ajay Devgn knoe the story of Ajay devgn Nukkad gang).

‘या’ पुरस्कारांवर कोरले नाव!

1992मध्ये अजय देवगणने आपला पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता. त्याला सर्वोत्कृष्ट न्यू-कमर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर अजयला ‘जख्म’ चित्रपटासाठी 1999मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘सिल्व्हर लोटस’ पुरस्कार मिळाला होता. अजय देवगणसाठी 2000चा हा काळ सुवर्णकाळ मानला गेला. त्यानंतर 2003 मध्ये पुन्हा त्याला ‘सिल्व्हर लोटस’ पुरस्कार मिळाला आणि ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याला गौरविण्यात आले होते. या चित्रपटासाठी त्याने फिल्मफेअर अवॉर्डही जिंकला होता.

त्यानंतर अजयने 5व्या अप्सरा फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड अवॉर्ड्स 2010मध्ये ‘ऑल द बेस्ट’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा पुरस्कार जिंकला होता. 2003 मध्ये, त्यांना रामगोपाल वर्माच्या ‘कंपनी’साठी फिल्मफेअर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. 2003 मध्येच अजयला ‘दिवानगी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार देण्यात आला होता.

(Happy Birthday Ajay Devgn knoe the story of Ajay devgn Nukkad gang)

हेही वाचा :

Amitabh Bachchan vaccine : बिग बी सहकुटुंब लसीकरणाला, मात्र ‘या’ कारणामुळे अभिषेकला लस घेता आली नाही!

Dia Mirza | 39 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाह, दीड महिन्यात बेबी बम्प, दिया मिर्झाच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.