Happy Birthday Mahesh Bhatt | परवीन बाबीसोबत अफेअर ते कंगनासोबत गैरवर्तन, अनेक वादांचा भाग बनलेयत महेश भट्ट

चित्रपट निर्माते महेश भट्ट (Mahesh Bhatt) हे नेहमीच चर्चांचा भाग असतात. ते इंडस्ट्रीमधील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण, त्यांचे वादांशी जुने नाते आहे. त्यांच्या विधानांमुळे ते अनेकदा अडचणीत येतात.

Happy Birthday Mahesh Bhatt | परवीन बाबीसोबत अफेअर ते कंगनासोबत गैरवर्तन, अनेक वादांचा भाग बनलेयत महेश भट्ट
Mahesh Bhatt
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 10:41 AM

मुंबई : चित्रपट निर्माते महेश भट्ट (Mahesh Bhatt) हे नेहमीच चर्चांचा भाग असतात. ते इंडस्ट्रीमधील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण, त्यांचे वादांशी जुने नाते आहे. त्यांच्या विधानांमुळे ते अनेकदा अडचणीत येतात. आज (20 सप्टेंबर) महेश भट्ट आपला 73वा वाढदिवस साजरा करत आहेत.

महेश भट्ट त्याच्या विवाहबाह्य संबंध आणि कधीकाळी मुलगी पूजा बेदीसोबत चुंबन फोटो देऊन वादांचा भाग बनले होते.

परवीन बाबीसोबत रिलेशनशिप

महेश भट्ट यांचे पहिले लग्न किरण भट्ट बरोबर झाले. त्यांचे लव्ह मॅरेज होते, पण या नात्यात दुरावा आला जेव्हा महेश भट्ट आणि परवीन बाबीच्या नात्याच्या बातम्या चर्चेत येऊ लागल्या. महेश भट्ट यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, परवीन बाबी यांच्याशी त्यांचे संबंध 1977 साली सुरू झाले. त्या इटलीहून भारतात परतल्या होत्या आणि त्यांचे कबीर बेदीसोबत ब्रेकअप झाले होते. त्यानंतर त्यांचे संबंध सुरू झाले. विवाहित असूनही महेश भट्ट परवीन बाबीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते. काही काळानंतर महेश यांनी त्यांना सोडले. तर काही काळानंतर तिने निरोप घेऊन हे जग सोडले. परवीन बाबीच्या मृत्यूनंतर महेश भट्टवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

विवादास्पद मॅगझीन कव्हर

महेश भट्टने स्वतःच्या मुलीला लिप किस केले. त्याचा हा फोटो स्टारडस्ट मासिकावर छापला गेला. या फोटोमुळे तयांच्यावर बरीच टीका झाली. या फोटोनंतर महेश भट्ट आणि त्यांची मुलगी पूजा यांच्यातील संबंध चर्चेत आले होते.

जिया खान आणि महेश भट्ट यांचा व्हिडिओ चर्चेत

गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित झाले होते. त्या दरम्यान जिया खान आणि महेश भट्ट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांच्या जवळ उभे होते आणि एकमेकांचा हात धरत होते. या व्हिडीओमध्ये दोघेही बोलताना आणि हसताना दिसत होते. या व्हिडीओनंतर महेश भट्टवर बरीच टीका झाली. रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ जिया 16 वर्षांची होती तेव्हाचा आहे.

कंगना रनौतने केले आरोप

कंगनाची बहीण रंगोलीने गेल्या वर्षी महेश भट्टवर अनेक आरोप केले होते. महेश भट्टने कंगनासोबत गैरवर्तन केल्याचे तिने म्हटले होते. कंगनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, महेश भट्टने तिला वेडी म्हटले होते आणि चप्पल फेकून तिला मारले होते. तिने सांगितले होते की, हा प्रसंग चित्रपट ‘वो लम्हे’च्या काळातला आहे. महेश भट्ट यांनी तिला स्वतःच्याच चित्रपटच्या प्रदर्शनाला जाऊ दिले नाही.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi | कलाकारांपासून ते कीर्तनकारांपर्यंत जाणून घ्या बिग बॉस मराठीच्या घरातील 15 स्पर्धकांची नावं, आता अनलिमिटेड मनोरंजन !

राज कुंद्राचे दोन साथीदार अद्याप मोकाटच, दोघेही परदेशात असल्याने अटक नाही

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....