AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Rhea Chakraborty | मैत्रिणीच्या पार्टीत भेट, मग मैत्री अन् प्रेम, जाणून घ्या कशी होती सुशांत आणि रिया चक्रवर्तीची लव्हस्टोरी

'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आज आपला 29वा वाढदिवस साजरा करत आहे. रियासाठी मागील 2020 खूप वाईट राहिले. 2020 मध्ये रियाचा बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) आत्महत्या करत या जगाचा निरोप घेतला होता.

Happy Birthday Rhea Chakraborty | मैत्रिणीच्या पार्टीत भेट, मग मैत्री अन् प्रेम, जाणून घ्या कशी होती सुशांत आणि रिया चक्रवर्तीची लव्हस्टोरी
सुशांत - रिया
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 10:21 AM

मुंबई : ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आज आपला 29वा वाढदिवस साजरा करत आहे. रियासाठी मागील 2020 खूप वाईट राहिले. 2020 मध्ये रियाचा बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) आत्महत्या करत या जगाचा निरोप घेतला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. ती आता स्वत:ची काळजी घेण्यात व्यस्त आहे. आज रियाच्या वाढदिवशी आपण जाणून घेऊय की हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले (Happy Birthday Rhea Chakraborty know about actress and sushant singh Rajput love story).

रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत यांची पहिली भेट 2003मध्ये झाली. त्यावेळी रिया तिची डेब्यू फिल्म ‘मेरे डॅड की मारुती’च्या यशाचा आनंद साजरा करत होती, तर सुशांत यश राज यांच्यासोबत ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटावर काम करत होता. सुशांतचा पहिला चित्रपट काही काळापूर्वीच प्रदर्शित झाला होता आणि त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा केली जात होती.

त्यानंतर इव्हेंट्स, पार्टीज किंवा स्टुडिओ शूटमध्ये दोघेही भेटत असत. रियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, आतापर्यंत दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत. अर्थात, ते वर्षातून एकदा भेटत असत, परंतु जेव्हा जेव्हा ते भेटत तेव्हा प्रत्येक विषयावर ते एकमेकांशी बोलत असत.

यशापासून ते करिअरपर्यंतच्या प्रत्येक गोष्टी केल्या शेअर

रियाने सांगितले एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांची मैत्री अशी होती की जेव्हा जेव्हा सुशांत तिला भेटायचा तेव्हा तो त्याच्या आनंद, करिअर, दु:ख सगळ्याबद्दल भरभरून बोलायचा. रियालाही तो आवडायला सुरुवात झाली होती आणि तिला नेहमीच आश्चर्य वाटायचे की हा इतरांपेक्षा कसा वेगळा आहे…

रिलेशनशिपला सुरुवात

एप्रिल 2019 मध्ये सुशांत आणि रिया पुन्हा रोहिणी अय्यरच्या पार्टीमध्ये भेटले. तिथून दोघांचे प्रेमाचे नाते सुरू झाले. रियाने सांगितले होते की, सुशांत तिला म्हणाला होता की त्याच दिवशी तो रियाच्या प्रेमात पडला होत, पण तिला हे सांगण्यास 2-3 महिने लागले.

युरोप टूरमध्ये फुललं प्रेम

सुशांत आणि रिया एकत्र युरोप सहलीला गेले होते. रियाने सांगितले की, सुशांत स्वित्झर्लंडच्या सहली दरम्यान खूप खुश झाला होता, पण इटलीला गेल्यानंतर तो आपल्या खोलीतून बाहेरच आला नाही. तो सलग तीन दिवस त्याच्या खोलीत राहिला. रिया म्हणाली की, ट्रिपपूर्वी सुशांत खूप आनंदित आणि उत्साहित होता. ट्रिपमध्ये आपण रियाला आपली खरी बाजू दाखवू, असे त्याने म्हटले होते. तो रस्त्यांवर मनसोक्त भटकणार होता, जे तो भारतात करू शकत नव्हता.

सहलीवरून परत आल्यानंतर दोघेही एकत्र राहू लागले होते. डिसेंबर 2019 पासून हे दोघे सुशांतच्या अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत होते. या दरम्यान सुशांत तणावात होता, लॉकडाऊनमध्ये त्याची तब्येत आणखी बिघडली होती. जूनमध्ये त्याचा आणि रियाचा वाद झाला होता आणि अभिनेत्याची बहीण त्याच्या भेटीला त्याच्या घरी येणार होती, त्यामुळे सुशांतने रियाला तिच्या घरी पाठवले. काही दिवसांनंतर, 14 जून रोजी सुशांत त्याच्या घरी मृत अवस्थेत आढळला.

सुशांतच्या मृत्यूनंतर रियाचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. यावेळी, ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे आणि स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

(Happy Birthday Rhea Chakraborty know about actress and sushant singh Rajput love story)

हेही वाचा :

Naseeruddin Shah | ज्या कारणामुळे झाला ब्रेकअप, त्याच कारणामुळे नसीरुद्दीन शाहंना मिळाला पहिला चित्रपट!

Mithun Chakraborty Net Worth: हॉटेल चेनचे मालक आहेत मिथुन चक्रवर्ती, पाहा अभिनेत्याची एकूण संपत्ती किती…

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.