Happy Birthday Sharat Saxena | अभियांत्रिकी सोडून शरत सक्सेनांचे मनोरंजन विश्वात पदार्पण, व्हिलन बनून गाजवला मोठा पडदा!

चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेले अभिनेते शरत सक्सेना (Sharat Saxena) यांचा जन्म 17 ऑगस्ट 1950 रोजी मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात झाला. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण भोपाळमधून पूर्ण केले. यानंतर त्यांनी जबलपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

Happy Birthday Sharat Saxena | अभियांत्रिकी सोडून शरत सक्सेनांचे मनोरंजन विश्वात पदार्पण, व्हिलन बनून गाजवला मोठा पडदा!
शरत सक्सेना
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 7:35 AM

मुंबई : चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेले अभिनेते शरत सक्सेना (Sharat Saxena) यांचा जन्म 17 ऑगस्ट 1950 रोजी मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात झाला. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण भोपाळमधून पूर्ण केले. यानंतर त्यांनी जबलपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. परंतु, शरत यांना अभियांत्रिकीमध्ये रस नव्हता. त्यांना अभिनेता व्हायचे होते. हेच कारण होते की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर शरत आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने 1972 साली मुंबईत आले.

यानंतर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरत यांच्या संघर्षांचा कालावधी सुरू झाला. पण, शरत यांनी कधीच हार मानली नाही, परिणामी शरत यांची मेहनत फळाला येऊ लागली.

बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली!

शरत हे कोणतीही चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील होते, त्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीत खूप संघर्ष करावा लागला. 1974मध्ये शरतला अमिताभ बच्चन, मौसमी चॅटर्जी, प्रेम चोप्रा स्टारर ‘बेनाम’ मध्ये अभिनयाची पहिली संधी मिळाली, ज्याने शरतच्या मनात त्यांच्या स्वप्नाची आशा पल्लवित केली. शरत यांचा हा पहिला रिलीज चित्रपट होता. पडद्यावरील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर त्यांना हिंदीसह तेलगू, मल्याळम, तामिळ आणि पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनयाच्या ऑफर येऊ लागल्या.

हळूहळू ते बॉलिवूडचे सर्वोत्तम सहाय्यक अभिनेते म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले आहे. 1977 मध्ये तो ‘एजंट विनोद’ चित्रपटात दिसला. 1987 मध्ये श्रीदेवी आणि अनिल कपूर अभिनीत ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील डागाच्या भूमिकेतील शरतच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप वाहवा मिळाली.

खलनायक म्हणून मिळाली ओळख!

सुरुवातीला, शरत बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसले आणि प्रेक्षकांनी त्यांना पडद्यावरील अशाच भूमिकांमध्ये खूप पसंत केले. पण हळूहळू नंतर शरत चित्रपटांमध्ये खलनायक तसेच सहाय्यक भूमिकेत दिसले आणि त्यांना खूप कौतुकही मिळाले. शरत यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘काला पत्थर’, ‘शक्ती’, ‘आखरी अदालत’, ‘शहेनशहा’, ‘ठाणेदार’, ‘वित्री’, ‘त्रिदेव’, ‘खिलाडी’, ‘घायाल’, ‘गुलाम’, ‘फना’, ‘बागबान’, ‘क्रिश’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’, ‘बजरंगी भाईजान’, ‘दबंग 3’ इत्यादींचा समावेश आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणारे शरत सक्सेना लवकरच मिलन लुथ्रिया दिग्दर्शित चित्रपट ‘तडप’मध्ये दिसणार आहेत.

(Happy Birthday Sharat Saxena Leaving Engineering, Sharat Saxena Enters Entertainment World)

हेही वाचा :

नव्या मालिका आणि नव्या जोड्या… पाहा कोणकोणत्या कलाकारांची नवी जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

करण जोहरचा पहिला वार, दिव्या अग्रवाल-प्रतीकनं केली शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ताची कॉपी?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.