कसं मिळालं अमिताभ यांना ‘बच्चन’ हे आडनाव? वाचा ‘बिग बीं’चा खास किस्सा…
आजकाल ‘महानायक’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) टीव्हीचा सर्वात मोठा क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती 13' होस्ट करत आहेत. या शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी मोकळेपणाने बोलतात. कधी त्यांचे शब्द अमिताभ यांना हसवतात तर, कधी त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील आणतात.
मुंबई : आजकाल ‘महानायक’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) टीव्हीचा सर्वात मोठा क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती 13’ होस्ट करत आहेत. या शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी मोकळेपणाने बोलतात. कधी त्यांचे शब्द अमिताभ यांना हसवतात तर, कधी त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील आणतात. प्रत्येक स्पर्धकासह, अमिताभ बच्चन स्वतःचा एखादा किस्सा शेअर करतात. अलीकडे, शोमधील एका स्पर्धकाने त्यांना विचारले की, त्यांच्या ‘बच्चन’ आडनावाचा नेमका अर्थ काय आहे आणि ते हे आडनाव का वापरतात?
यावर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आडनावाची एक रोचक गोष्ट सांगितली. जर, तुम्हाला देखील माहित नसेल की, बच्चन म्हणजे काय आणि अमिताभ ‘बच्चन’ हे आडनाव का वापरतात, तर जाणून घेऊया अमिताभ यांच्या जीवनाशी संबंधित हा रोचक किस्सा…
केबीसीमध्ये भावनिक झाले बिग बी
खरं तर, केबीसीच्या शोमध्ये स्पर्धक भाग्यश्रीने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. लग्नानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संबंध तोडले. ती आई झाल्यानंतरही भाग्यश्रीचे वडील तिच्यावर रागावलेच आहेत. भाग्यश्रीचे हे शब्द ऐकून अमिताभ बच्चन दुःखी होतात आणि भाग्यश्रीच्या वडिलांना त्यांची नाराजी विसरून त्यांच्या मुलीशी पुन्हा बोलण्याची विनंती करतात.
अमिताभ म्हणाले- ‘मी स्वतः इंटरकास्ट लग्नातून जन्मलो आहे’!
या शो दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, मला ही गोष्ट वैयक्तिकरित्या लागते, कारण मी स्वतः इंटरकास्ट लग्नातून जन्मलो आहे. ही 1942 मधील घटना आहे, माझी आई शीख कुटुंबातील होती तर माझे वडील कायस्थ कुटुंबातील होते, जे उत्तर प्रदेशात राहत होते. दोघांचेही कुटुंब या विवाहाच्या विरोधात होते. पण, नंतर सर्वांनी सहमती दर्शवली आणि माझ्या आई-वडीलांचे लग्न झाले.
म्हणूनच बच्चन आडनाव पडले!
अमिताभ बच्चन यांनी एकदा सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘बाबूजींचा जन्म कायस्थ कुटुंबात झाला होता आणि श्रीवास्तव हे त्यांचे आडनाव होते. पण ते जाती व्यवस्थेच्या विरोधात होते. बाबूजींनी त्यांच्या वेदनादायक तपश्चर्याला नाव दिले, ‘बच्चन’! त्यांनी त्यांची सर्व कीर्ती, त्यांचे संपूर्ण आयुष्य या नावाशी जोडले.’ वास्तविक, हरिवंश राय यांनी त्यांचे आडनाव ‘श्रीवास्तव’ बदलून ‘बच्चन’ केले होते. महान लेखक आणि कवी अनेकदा अशी त्यांची उपनावे ठेवतात.
शाळेच्या दिवसांची किस्सा…
जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या शिक्षकांनी प्रवेश अर्जात त्यांचे आडनाव लिहायला सांगितले, तेव्हा त्यांच्या पालकांनी लगेच आपापसात बोलून ठरवले की ‘बच्चन’ हे यापुढे कुटुंबाचे आडनाव असेल. आणि तिथून पुढे ‘बच्चन’ हे आडनाव आमच्या कुटुंबाला मिळाले. अमिताभ बच्चन म्हणतात की, ‘हे नाव आमच्यासोबत कायम राहील आणि असेच राहील…माझे वडील आणि बच्चन या आडनावाचा मला खूप अभिमान आहे.’
हेही वाचा :
Video | शॉर्ट फिल्मसाठी देबिना बनर्जीने केले मुंडन, सोशल मीडियावर शेअर केला लूक, पाहा व्हिडीओ…