AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hrithik Roshan: ‘ही हृतिकची गर्लफ्रेंड आहे की मुलगी?’; हातात हात घालून चालतानाचा VIDEO पाहिल्यावर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

गेल्या काही दिवसांपासून ज्या अफेअरची चर्चा होती, अखेर अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) अप्रत्यक्षपणे त्या चर्चांवर शिक्कामोर्तब केला आहे. अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) आणि हृतिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत.

Hrithik Roshan: 'ही हृतिकची गर्लफ्रेंड आहे की मुलगी?'; हातात हात घालून चालतानाचा VIDEO पाहिल्यावर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Hrithik Roshan, Saba AazadImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 9:06 AM

गेल्या काही दिवसांपासून ज्या अफेअरची चर्चा होती, अखेर अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) अप्रत्यक्षपणे त्या चर्चांवर शिक्कामोर्तब केला आहे. अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) आणि हृतिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. या दोघांना सर्वांत आधी एका हॉटेलबाहेर एकत्र पाहिलं गेलं. त्यानंतर आता मुंबई विमानतळावर हृतिक आणि सबा हातात हात घालून दिसले. यावेळी पापाराझींनी या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो क्लिक केले. हृतिक-सबाचा हा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. ‘आता कसल्या चर्चा, या दोघांनीच डेटिंग करत असल्याचं कन्फर्म केलंय’, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिले. तर अनेकांनी हृतिकला ट्रोलसुद्धा केलं. (Bollywood)

हृतिक आणि सबाच्या वयात जवळपास 17 वर्षांचं अंतर आहे. एअरपोर्टवरील या दोघांचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला, तेव्हा नेटकऱ्यांनी वयावरून या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘ही हृतिकची गर्लफ्रेंड आहे की मुलगी’, असाही उपरोधिक प्रश्न एका युजरने विचारला. तर हिच्यापेक्षा कंगना बरी होती, असंही एकाने म्हटलं. हृतिक आणि अभिनेत्री कंगना रनौत एकमेकांना डेट केल्याच्या चर्चा होत्या. या दोघांमधील वाद सर्वश्रुत आहे. ‘पैसे असल्यावर काहीही शक्य होतं’, असाही टोमणा एका नेटकऱ्याने मारला.

हृतिक-सबाचा व्हिडीओ-

हृतिकच्या कुटुंबीयांशीही सबाची जवळीक वाढली आहे. त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून तिने जेवण केलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचं म्हटलं जातं. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.

हृतिकने 2000 मध्ये सुझान खानशी लग्न केलं. या दोघांना रेहान आणि हृदान ही दोन मुलं आहेत. जवळपास 13 वर्षांच्या संसारानंतर 2013 मध्ये हृतिक आणि सुझानने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता हृतिक सबाला डेट करत आहे, तर सुझान ही अभिनेता अर्सलान गोणीला डेट करतेय. अर्सलान हा बिग बॉस फेम अली गोणीचा भाऊ आहे.

हेही वाचा:

Aai Kuthe Kay Karte: ‘नाहीतर लोक मला जोड्याने मारतील’, मेधाताईंसोबतच्या सीन्सबद्दल अनिरुद्धची लेखिकेला खास विनंती

ट्विंकल खन्नाने The Kashmir Filesची उडवली खिल्ली; म्हणाली ‘आता मीसुद्धा..’

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.