साऊथमध्येही ‘पठाण’चाच बोलबाला, पाहा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील शाहरुख खानच्या चित्रपटाची कमाई
प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर फक्त आणि फक्त पठाणचीच हवा बघायला मिळाली. या चित्रपटाबद्दल सुरूवातीपासूनच शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ होती.
मुंबई : शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर करताना दिसत आहे. पठाण या चित्रपटाने नुकताच दंगल या चित्रपटाचा रेकाॅर्ड तोडला आहे. दंगल हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. मात्र, आता हे रेकाॅर्ड पठाण चित्रपटाने आपल्या नावावर केले. पठाण या चित्रपटाने ११ दिवसांमध्ये भारतामधून तब्बल ४०० कोटींचे बाॅक्स ऑफिस (Box office) कलेक्शन करत अनेकांना मोठा धक्का दिलायं. जगभरातून पठाण या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल ७५० कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले. शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर पुनरागमन करत हे परत एकदा दाखून दिले आहे की, उगाच आपल्याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जात नाही. पठाण चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर फक्त आणि फक्त पठाणचीच हवा बघायला मिळाली. या चित्रपटाबद्दल सुरूवातीपासूनच शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ होती.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची थेट मागणी करून टाकली होती. परंतू याचा काहीच फरक पठाण चित्रपटाच्या बाॅक्स ऑफिस कलेक्शनवर झाला नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जात होते. बिग बजेटचे चित्रपट फ्लाॅप जात असल्याने मोठे नुकसान बाॅलिवूडला सहन करावे लागले. अनेकांनी सतत बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असताना बाॅलिवूडला टार्गेट देखील केले होते.
बाॅलिवूडे चित्रपट एकीकडे फ्लाॅप जात असताना दुसरीकडे साऊथचे चित्रपट जोरदार कमाई करताना दिसले. विशेष बाब म्हणजे पठाण चित्रपटाला साऊथच्या चाहत्यांनी देखील मोठा प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे.
आंध्रप्रदेश आणि तेलंगनामध्ये पठाण चित्रपटाने पाच दिवसांमध्ये २३.३० कोटींचे कलेक्शन केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तर कर्नाटकमध्ये चित्रपटाने २२ कोटीचे कलेक्शन केले आहे. तमिलनाडुमध्ये चित्रपटाने १३ कोटीचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले.
कमाईमध्ये केरळ राज्यात पठाण या चित्रपटाने आमिर खान याच्या दंगल चित्रपटाचे रेकाॅर्ड तोडले आहे. पठाण हा केरळमधील सर्वात मोठा बाॅलिवूड चित्रपट ठरला आहे. दंगल चित्रपटापेक्षा केरळमध्ये पठाण या चित्रपटाने १० कोटींची जास्त कमाई केली आहे. रिपोर्टनुसार केरळमध्ये पठाण या चित्रपटाने १० दिवसांमध्ये ११.३५ कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.