Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्याने जॅकेटने लपवला बेबी बंप? पुन्हा एकदा प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण

मुंबई विमानतळावरील त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच ऐश्वर्याच्या प्रेग्नंसीची (pregnant) पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्याने जॅकेटने लपवला बेबी बंप? पुन्हा एकदा प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण
पुन्हा एकदा प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 5:53 PM

बॉलिवूडचं पॉवरफुल कपल अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय नुकतेच (Aishwarya Rai Bachchan) मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आराध्या बच्चनही होती. तिघंही न्यूयॉर्कहून परतले आहेत. मुंबई विमानतळावरील त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच ऐश्वर्याच्या प्रेग्नंसीची (pregnant) पुन्हा एकदा चर्चा होत आहे. ऐश्वर्याच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांमध्ये तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलंय. ऐश्वर्याने तिचं पोट कपड्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला आहे, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय ही तिची मुलगी आराध्याचा हात धरून विमानतळाबाहेर पडताना दिसत आहे. त्यांच्या मागून अभिषेक बच्चन येताना पहायला मिळतोय. फुल लेंथ वन पीस आणि त्यावर लांब कोट, स्नीकर्स असा ऐश्वर्याचा लूक आहे. तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून जॅकेटने पोट लपवताना दिसत आहे. आराध्यानेही आईप्रमाणे काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. ऐश्वर्याला असं पाहून नेटकरी व्हिडिओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. ऐश्वर्या प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. याआधीही ऐश्वर्याच्या प्रेग्नंसीच्या अफवा अनेकदा पसरल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

जेव्हा अभिषेक बच्चन ‘धूम 2’चं शूटिंग करत होता, तेव्हा तो ऐश्वर्याच्या प्रेमात पडला. या दोघांनी त्यापूर्वी ‘ढाई अक्षर प्रेम के’ आणि ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. 14 जानेवारी 2007 रोजी त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा झाली आणि त्यानंतर त्यांनी त्याच वर्षी एप्रिलमध्ये लग्न केलं. 16 नोव्हेंबर 2011 रोजी ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला. ऐश्वर्याच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यात ती लवकरच दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच त्याचा टीझर रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये ऐश्वर्याचा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. या चित्रपटात विक्रम, कार्ती यांच्यासह अनेक नामांकित स्टार्स दिसणार आहेत.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.