AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना राणावत हिच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच बोलले जावेद अख्तर, प्रचंड अपमानित झाल्यासारखे वाटले, मी लखनऊचा तिथे…

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडते. वादामध्ये कायमच कंगना राणावत ही अडकते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर कायमच बाॅलिवूड स्टार असतात. कंगना राणावत हिने काही वर्षांपूर्वी जावेद अख्यर यांच्यावर मोठे आणि गंभीर आरोप केले.

कंगना राणावत हिच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच बोलले जावेद अख्तर, प्रचंड अपमानित झाल्यासारखे वाटले, मी लखनऊचा तिथे...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 3:41 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही कायमच चर्चेत असते. विषय कोणत्याही असो कंगना आपल्या मत मांडताना कोणताच विचार करत नाही. 2020 मध्ये कंगना राणावत हिने जावेद अख्तर यांच्यावर अनेक गंभीर आरोप (Serious Charges) केले. कंगना राणावत हिने थेट एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासे करत जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्याबद्दल मोठा खुलासा केला. कंगना राणावत हिच्या आरोपांनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. थेट जावेद अख्तर यांनी आपल्याला धमकी दिल्याचे कंगना हिने म्हटले. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले. चित्रपटसृष्टीमध्येही कंगना राणावत हिच्या आरोपांनंतर मोठी खळबळ निर्माण झाली.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कंगनाने हे सर्व आरोप जावेद अख्तर यांच्यावर केले होते. कंगना राणावत हिच्या आरोपांनंतर जावेद अख्तर यांनी थेट कोर्टामध्ये धाव घेतली. कंगना राणावत हिच्या विरोधात जावेद अख्तर यांनी कोर्टात अर्ज दाखल केला. या प्रकरणात तीन वेळा सुनावणी देखील झालीये. नुकताच या संदर्भातील सुनावणी पार पडलीय.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार जावेद अख्तर मजिस्ट्रेटसमोर म्हणाले की, मुळात म्हणजे माझ्यावर लावण्यात आलेले हे सर्व आरोप चुकीचे आहेत. मी लखनऊचा आहे, तिथे तू ऐवजी तुम्ही बोलले जाते. म्हणजे आपल्यापेक्षा वयाने 30-35 वर्ष लहान असलेल्यांना देखील तिथे तुम्ही, आप म्हणून बोलले जाते. इतकेच नाही तर मी माझ्या आयुष्यात माझ्या वकिलांना सुध्दा कधीच तू म्हणून बोललो नाहीये.

मुळात म्हणजे माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांनंतर मला स्वत: लाच अत्यंत मोठा धक्का बसला आणि मी आश्चर्यचकित झालो. फेब्रुवारी 2020 मध्ये कंगनाने माझ्यावर एका मुलाखती वेळी एक आरोप केला. त्यानंतर काही महिन्यांमध्ये सुशांत सिंह याने आत्महत्या केली. त्यानंतर कंगना राणावत हिची एक मुलाखत प्रचंड चर्चेत आली.

कंगनाच्या या मुलाखतीवर मी काहीच प्रतिक्रिया देखील दिली नाही. मात्र, जेंव्हा तिने माझ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला त्यावेळी मला खूप जास्त अपमानित झाल्यासारखे वाटले. फक्त इतकेच नाही तर यादरम्यान तिने मला एका आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या गटाचा भाग आहे आणि अशाच प्रकारे लोकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो, असेही म्हटले आहे. मात्र, हे अजिबात खरे नाहीये. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर कंगना हिने जावेद अख्यर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.