Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दे दे प्यार दे’मधील अमिताभ बच्चनची ‘ती’ ट्रेंड स्टेप कोरिओग्राफी नाही तर होता अपघात! वाचा किस्सा….

बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री जया प्रदा (Jaya Prada) सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’च्या सेटवर पाहुण्या म्हणून हजेरी लावली होती. यावेळी, या शोच्या सर्व स्पर्धकांनी विशेष तयारी केली होती.

‘दे दे प्यार दे’मधील अमिताभ बच्चनची ‘ती’ ट्रेंड स्टेप कोरिओग्राफी नाही तर होता अपघात! वाचा किस्सा....
अमिताभ बच्चन, जया प्रदा
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 9:33 AM

मुंबई : बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री जया प्रदा (Jaya Prada) सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’च्या सेटवर पाहुण्या म्हणून हजेरी लावली होती. यावेळी, या शोच्या सर्व स्पर्धकांनी विशेष तयारी केली होती. या कार्यक्रमाच्या विशेष भागात जया प्रदा यांची गाजलेली गाणी सादर केली गेली. त्याचवेळी जया प्रदा यांनी देखील त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील अनेक किस्से शेअर केले. या दरम्यान, जया प्रदा यांनी 1984 मधील सुपरहिट चित्रपट ‘शराबी’तील ‘दे दे प्यार दे’ या सुपरहिट गाण्याचा एक खास किस्सा शेअर केला (Jaya Prada Share De de Pyar de Amitabh bachchan accident incident on indian idol 12 set).

हा किस्सा सांगताना जया म्हणाल्या की, या गाण्याच्या शूटिंग दरम्यान फटाके फोडण्याच्या एका सीनदरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा हात पोळला होता. परंतु, तरीही त्यांनी आपला जखमी हात खिशात ठेवून त्यांनी या गाण्याचे शूटिंग पूर्ण केले होते.

पाहा व्हिडीओ

सोनी टीव्हीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात जया प्रदा इंडियन आयडॉलच्या सेटवर परीक्षकाच्या खुर्चीत दिसत आहेत. यावेळी त्यांनी ‘शराबी’ या चित्रपटातील एक खास किस्सादेखील शेअर केला. ‘शराबी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांचा हात जळला होता. मात्र, चित्रीकरण पूर्ण करायचे असल्याने त्यांनी आपला जखमी हात खिशात ठेवला आणि मग पुढे चित्रीकरणादरम्यान ती त्यांची स्टाईल बनली आणि या संपूर्ण गाण्यातील ही त्यांची शैली चाहत्यांना खूप आवडली (Jaya Prada Share De de Pyar de Amitabh bachchan accident incident on indian idol 12 set).

कोरिओग्राफी नाही नव्हे अपघात!

जया पुढे म्हणाल्या की, आपल्या परिस्थितीला अडचणींशी कसे जुळवायचे हे अमितजींना स्पष्टपणे माहित आहे. हात भाजल्यानंतर अमितजींनी हाताला रुमाल बांधला आणि मग गाण्याचे शूटिंग आरामात पूर्ण केले. जया प्रदा यांनी हा किस्सा सांगताच सेटवर उपस्थित प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला. कारण बर्‍याच वर्षांपासून प्रत्येकाला असेच वाटत होते की अमिताभ बच्चन पॅन्टच्या खिशात हात ठेवून या गाण्याच्या तालावर नाचत आहेत, तो कोरिओग्राफीचा एक भाग होता.

यावेळी जया प्रदा यांनी सुपरहिट गाणे ‘नौलखा मंगा दे’वर नृत्य देखील सादर केले. या वयातही त्यांची नृत्य शैली पाहून मंचावर उपस्थित सगळेच थक्क झाले. कार्यक्रमाच्या परीक्षकांसह स्पर्धकांनी देखील त्यांच्यासह या गाण्यावर ठेका धरला होता. सगळ्यांनीच त्यांचे खूप कौतुक केले.

(Jaya Prada Share De de Pyar de Amitabh bachchan accident incident on indian idol 12 set)

हेही वाचा :

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेने शेअर केलेले ‘क्लीवेज’ फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

अर्जुनच्या ‘त्या’ कृत्यामुळे महानायकासमोर व्हावे लागले खजील, सचिन तेंडुलकरने सांगितला किस्सा…

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.