Pathaan | पठाण चित्रपटातील जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक शेअर, 2023 मध्ये चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला…
शाहरुख खानने सोशल मीडियावर पठाण चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूक शेअर केला. शाहरुखने एक छोटा टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये टाईम बॉम्बचा स्फोट होतो आणि त्यानंतर धूर निघाल्यानंतर जॉन अब्राहम दिसतो.
मुंबई : शाहरुख खानच्या पठाण (Pathaan) चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. शाहरुख खान पठाणच्या माध्यमातून तब्बल चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित (Displayed) होणार आहे. मात्र 5 महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या स्टारकास्टचे फर्स्ट लूक समोर आले आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान, जॉन अब्राहमचा (John Abraham) चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज झालायं. फर्स्ट लूक धमाकेदार दिसत आहे. मोशन पोस्टरमध्ये जॉन अब्राहमचा लूक जबरदस्त दिसतोयं.
इथे पाहा शाहरुख खानने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट
शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’ पुढील वर्षी म्हणजेच 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. ज्यामध्ये जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. फर्स्ट लूकमध्येच जॉनने आपल्या दमदार लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची झलक पाहून लोकांमध्ये चित्रपटाबद्दल अजून उत्सुकता निर्माण झालीयं. पठाण हा चित्रपट हिंदीशिवाय तमिळ आणि तेलगूमध्येही प्रदर्शित होत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केलीयं.
शाहरुख खानने सोशल मीडियावर पठाण चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूक शेअर केला
शाहरुख खानने सोशल मीडियावर पठाण चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूक शेअर केला. शाहरुखने एक छोटा टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये टाईम बॉम्बचा स्फोट होतो आणि त्यानंतर धूर निघाल्यानंतर जॉन अब्राहम दिसतो. मोशन टीझरमध्ये जॉन अॅक्शन स्टाइलमध्ये दिसत आहे. शाहरुखने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ये रफ है और रहाता भी भी साई है. जॉन अब्राहम पठाण. जॉनचा हा लूक आणि स्वॅग सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. आता जॉन अब्राहमचा चित्रपटातील फस्ट लूक सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे