AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कबीर खान आता पॅराप्लेजिक ऑलिम्पियनचा बायोपिक बनवणार, कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार

या चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त करताना कार्तिक आर्यनने कबीर खान आणि साजिद नाडियाडवाला यांचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे माझ्यासाठी खूप खास आहेत. मी माझे आवडते चित्रपट निर्माते आणि माझ्या @kabirkhankk आणि #SajidNadiadwala सरांच्या या रोमांचक प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहे.

कबीर खान आता पॅराप्लेजिक ऑलिम्पियनचा बायोपिक बनवणार, कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 11:51 AM

मुंबई : कार्तिक आर्यनच्या (Karthik Aryan) ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. कोरोना महामारीनंतरचा हा पहिलाच चित्रपट होता जो यशस्वी झाला. आता कार्तिक विषयी एक महत्वाची बातमी पुढे येते आहे, कबीर खानच्या (Kabir Khan) पुढील चित्रपटात तो पॅराप्लेजिक ऑलिम्पियनची भूमिका साकारणार आहे. कबीर खान दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) निर्मित या चित्रपटात कार्तिक आर्यन ‘पॅराप्लेजिक ऑलिम्पियन’च्या भूमिकेत दिसणार असल्याची एकच चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर कार्तिक आर्यनचे चाहते खूप खुश असल्याचे देखील कळते आहे.

इथे पाहा कार्तिक आर्यनने शेअर केलेली पोस्ट

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनने कबीर खान आणि साजिद नाडियाडवाला यांचा एक फोटो शेअर

या चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त करताना कार्तिक आर्यनने कबीर खान आणि साजिद नाडियाडवाला यांचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे माझ्यासाठी खूप खास आहेत. मी माझे आवडते चित्रपट निर्माते आणि माझ्या @kabirkhankk आणि #SajidNadiadwala सरांच्या या रोमांचक प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहे. हा एक बायोपिक चित्रपट असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्या ऑलिम्पियनची बायोपिक बनवली जात आहे त्याची संमती घेतली असावी हे तर स्पष्टच आहे.

भूल भुलैया 2 नंतर कार्तिकचा हा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रणवीर सिंहने सांगितले होते की, त्याला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. ’83’ आणि ‘स्त्री’ या चित्रपटाचे लेखक सुमित अरोरा यांनीही या चित्रपटाचे लेखन केले आहे. कबीर खान, साजिद नाडियाडवाला आणि अभिनेता कार्तिक आर्यन देखील या स्क्रिप्टवर खूप खूश असल्याचे सांगितले जात आहे. भूल भुलैया 2 नंतर कार्तिकचा हा चित्रपट काय कमाल करणार हे पाहण्याासारखे आहे. मात्र, कार्तिकचे चाहते त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.