AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut Controversy | दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही!, कंगना रनौत पुन्हा बरळली!

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लेख शेअर केला आहे.

Kangana Ranaut Controversy | दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही!, कंगना रनौत पुन्हा बरळली!
कंगना.
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 11:44 AM

मुंबई : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लेख शेअर केला आहे. त्याच्या मथळ्यात असे लिहिले आहे की, ‘तुम्ही एकतर गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक… तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. आता ते तुम्हीच ठरवा.’ तिने पुढे लिहिले की, ‘दुसरा गाल दिल्याने दान मिळते, स्वातंत्र्य नाही.’

कंगनाने लिहिले की, ‘ज्यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती, पण सत्तेची भूक होती अशांनी स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रजांच्या स्वाधीन केले.’ ती पुढे म्हणाली, ‘आपल्याला कोणी एका गालावर थप्पड मारली, तर दुसरा गाल पुढे करा, आणि त्यामुळेच तुम्हाला स्वातंत्र्य मिळते, असे त्यांनीच आम्हाला शिकवले. अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळत नाही, अशी भिक्षा मिळू शकते. तुमचे हिरो हुशारीने निवडा.’

पद्मश्री पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली की, ‘गांधींनी भगतसिंग किंवा सुभाषचंद्र बोस यांना कधीही पाठिंबा दिला नाही… भगत सिंग यांना फाशी द्यावी अशी गांधीजींची इच्छा होती याचा पुरावा… त्यामुळे तुम्ही कोणाला पाठिंबा देता हे निवडणे आवश्यक आहे…”

स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य

अलीकडेच अभिनेत्री कंगना रनौतने नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले आणि 2014 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, तर 1947 मध्ये देशाला मिळालेले स्वातंत्र्य ‘भीक’ होते, असे बोलून नव्या वादाला तोंड फोडले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे.

या टीकेनंतर कंगनाने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘मी स्पष्टपणे सांगितले आहे की, 1857ची क्रांती ही पहिली स्वातंत्र्य लढा होती, जी दडपली गेली आणि परिणामी ब्रिटिशांचे अत्याचार आणि क्रूरता वाढली आणि सुमारे शतकानंतर आम्हाला गांधीजीच्या भांड्यात भीकरुपी स्वातंत्र्य दिले गेले.’

स्वतःच्या वक्तव्याचे समर्थन!

सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर कंगनाने इंस्टाग्रामवर एक लांबलचक स्टोरी टाकून तिच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तिने लिहिले आहे की, ‘1947 मध्ये नेमके काय घडले, हे कोणी सांगितल्यास ती पद्मश्री पुरस्कार परत करेल.’ तिने एका कात्रणाचा फोटो टाकून लिहिले आहे की, सर्व काही अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे. 1857मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहीत आहे, पण 1947 मध्ये  कोणती लढाई झाली हे मला माहिती नाही.’

हेही वाचा :

Chhorii | शूटिंगच्या आधीपासूनच प्रेग्नंट बॉडी सूट घालण्यास सुरुवात, नुसरत भरुचाने ‘छोरी’ चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी अशी केली तयारी!

Marathi Movie | सुयश टिळक-मिताली मयेकरची ‘हॅशटॅग प्रेम’कथा, नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

‘डिस्को डान्सर’च्या दिग्दर्शकाची आर्थिक स्थिती बिकट, पत्नीच्या उपचारासाठी लोकांकडे मागतायत मदत!

‘आला आला आला आला खुर्चीचा राजा आला..’, सत्तेच्या ‘खुर्ची’त विराजमान होणार चिमुकला अभिनेता!

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.