AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपिल शर्माने ‘द काश्मीर फाईल्स’ला प्रमोट करण्यास दिला नकार? अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य

'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटामुळे कॉमेडियन कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. #BycottKapilSharmaShow या हॅशटॅगचा वापर करत नेटकरी कॉमेडियन कपिल शर्माविरोधात (Kapil Sharma) संताप व्यक्त करत आहेत आणि त्याच्या शोवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.

कपिल शर्माने 'द काश्मीर फाईल्स'ला प्रमोट करण्यास दिला नकार? अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य
अनुपम खेर, कपिल शर्माImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 12:17 PM

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटामुळे कॉमेडियन कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. #BycottKapilSharmaShow या हॅशटॅगचा वापर करत नेटकरी कॉमेडियन कपिल शर्माविरोधात (Kapil Sharma) संताप व्यक्त करत आहेत आणि त्याच्या शोवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर हा विरोध सुरू झाला. ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये मोठमोठे स्टार्स नसल्याने कपिल शर्माने आम्हाला त्यांच्या शोमध्ये बोलावलं नाही, अशा आशयाचं हे ट्विट होतं. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकीकेड कपिलवर टीका होत असतानाच आता ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांनी सत्य काय आहे ते सांगितलं.

काय म्हणाले अनुपम खेर?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम यांनी सांगितलं की त्यांना द कपिल शर्मा शोमध्ये येण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र चित्रपटाचा विषय अत्यंत गंभीर असल्याने त्यांना ‘द कपिल शर्मा शो’सारख्या कॉमेडी शोमध्ये जायचं नव्हतं. “प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला शोसाठी कॉल आला होता. मात्र मी माझ्या मॅनेजरला सांगितलं की, चित्रपटाचा विषय गंभीर आहे. त्यामुळे मी कॉमेडी शोमध्ये त्याच्या प्रमोशनसाठी नाही जाऊ शकत. दोन महिन्यांपूर्वीच मला बोलावण्यात आलं होतं. पण गंभीर विषयाचा चित्रपट कॉमेडी शोमध्ये प्रमोट करणं मला नाही पटलं”, असं ते म्हणाले.

कपिल शर्माने मानले अनुपम खेर यांचे आभार

आपल्यावर टीका होत असताना अनुपम यांनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलं, सत्य काय आहे ते सांगितलं याबद्दल कपिलने त्यांचे आभार मानले. अनुपम खेर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत कपिलने लिहिलं, ‘थँक्यू पाजी.. माझ्या विरोधातील सर्व चुकीच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी आणि त्या मित्रांचेही आभार ज्यांनी सत्य जाणून न घेता माझ्यावर इतकं प्रेम केलं. खुश रहा, हसत रहा.’

कपिलने नेटकऱ्याला दिलं सडेतोड उत्तर

‘द काश्मीर फाईल्सला प्रमोट करण्यास कपिल का घाबरला? त्याला कोणत्या गोष्टीची भीती वाटत होती? विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या चित्रपटातील प्रतिष्ठित स्टारकास्टला निमंत्रण का दिलं नाही? भावा, मी तुझा खूप मोठा चाहता होतो, पण तू माझी आणि द कपिल शर्मा शोच्या लाखो चाहत्यांची निराशा केलीस’, असं ट्विट एका नेटकऱ्याने कपिलला टॅग करत केलं होतं. त्यावर कपिल शर्माने उत्तर दिलं. ‘राठोड साहेब हे खरं नाहीये. तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं, पण ज्यांनी या गोष्टीला सत्य मानलंय त्यांना स्पष्टीकरण देण्याचा काय उपयोग? एक अनुभवी सोशल मीडिया युजर म्हणून मी एक सल्ला देऊ इच्छितो. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात एकतर्फी कथेवर कधीच विश्वास ठेवू नका’, असं कपिलने लिहिलं.

हेही वाचा:

‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईत लक्षणीय वाढ; दुसऱ्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

‘इंडियन आयडॉल 12’ फेम पवनदीप-अरुणिता कायद्याच्या कचाट्यात; वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.