सहा महिने लपवलं आता समोर आलं, करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती आहे का ?
सिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव अखेर सार्वजनिक झाले आहे. या दामपत्याच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर आहे. सैफ आणि करिना यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला फेब्रुवारीमध्ये जन्म दिला होता.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव अखेर सार्वजनिक झाले आहे. या दामपत्याच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर (Jahangir) आहे. सैफ आणि करिना यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला फेब्रुवारीमध्ये जन्म दिला. तेव्हापासून त्यांच्या या मुलाचे नाव गुलदस्त्यात होते. करीना कपूरने तुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकात तिच्या मुलाचे नाव देण्यात आले आहे. (Kareena Kapoor and Saif Ali Khan second son name is Jahangir Kareena reveals name in her book)
मुलाचे नाव सार्वजनिक केले नव्हते
करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या पहिल्या आपत्याला 20 डिसेंबर 2016 मध्ये जन्म दिला. पहिले मुल होताच त्यांनी त्याचे नाव जाहीर केले. या जोडीने त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव तैमुर असे ठेवले. या नावानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर या जोडीने त्यांच्या दुसऱ्या आपत्याला फेब्रुवारी 2021 मध्ये जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यानंतर ही जोडी आनंदात त्याचे नाव जाहीर करेल असा त्यांच्या चाहत्यांचा कयास होता. मात्र, करीना आणि सैफने असे केले नाही. त्यांनी फेब्रुवारीनंतर अद्याप त्यांच्या मुलाचे नाव सार्वजनिक केले नव्हते.
पुस्तकाच्या शेवटच्या पानावर केले नाव जाहीर
मात्र, करीनाने तिचे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. या पुस्तकात तिने आपल्या प्रेग्नेंसिबद्दल सविस्तर लिहले आहे. पुस्तकात तिने आपल्या मुलाचे नाव जहांगीर असल्याचे सांगितेल आहे. यामध्येही आपल्या मुलाचे नाव जाहीर करताना तिने खूप काळजी घेतलेली आहे. आपल्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर करीनाने तिच्या दुसऱ्या मुलासोबत आपला फोटो टाकला आहे. या फोटोखाली तिने आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर असल्याचे सांगितले आहे.
इतर बातम्या :
Shefali Jariwala : शेफाली जरीवालाचा कातिलाना अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर
Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या ‘तमाशा लाईव्ह’चं पोस्टर रिलीज
(Kareena Kapoor and Saif Ali Khan second son name is Jahangir Kareena reveals name in her book)
Flipkart सेलमध्ये Iphone वर 10000 रुपयांहून अधिक डिस्काऊंट#Flipkart #Sale #Iphonehttps://t.co/j3umUuKxd9
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021