Kareena Kapoor Baby Boy Pic : रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला तैमूरच्या भावाचा फोटो, पाहा कसा दिसतो चिमुकला नवाब…

फेब्रुवारी महिन्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) या जोडीला पुन्हा एकदा पुत्ररत्न प्राप्ती झाली. करीना कपूर खानने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला आहे.

Kareena Kapoor Baby Boy Pic : रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला तैमूरच्या भावाचा फोटो, पाहा कसा दिसतो चिमुकला नवाब...
करीना कपूर-खान
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 11:37 AM

मुंबई : फेब्रुवारी महिन्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) या जोडीला पुन्हा एकदा पुत्ररत्न प्राप्ती झाली. करीना कपूर खानने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला आहे. यापूर्वी करीनाला तैमूर आली खान नावाचा एक मुलगा आहे. करीनाने आतापर्यंत आपल्या धाकट्या मुलाला मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवले होते. करीनाच्या दुसर्‍या मुलाच्या एका झालकेसाठी चाहते उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत आता करीनाच्या चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे (Kareena Kapoor Baby Boy photo Randhir Kapoor Accidently share on social media).

अभिनेत्री करीना कपूरने अद्याप तिच्या दुसऱ्या मुलाची झलक सोशल मीडियावर शेअर केलेली नाही. इतकेच नाही तर, तैमूरच्या धाकट्या भावाचे नाव काय आहे, हेदेखील अभिनेत्रीने सांगितले नाही. पण आता एक फोटो प्रचंड चर्चेत आला आहे. हा फोटो करीनाचे वडील अर्थात अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी चुकून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, आपली चूक लक्षात येताच त्यांनी हा फोटो दिलीत केला. परंतु, तोपर्यंत हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला.

पाहा करीनाच्या लहान मुलाचा फोटो

असे दिसते आहे की, करीनाचे वडील, अभिनेते रणधीर कपूर आपल्या धाकट्या नातवाचा पहिला फोटो शेअर करण्यास उत्सुक झाले आहेत. म्हणूनच त्यांनी नातवाचा पहिला फोटो शेअर करण्यासाठी चुकून आपल्या इन्स्टाग्राम हँडलचा वापर केला होता. यानंतर त्यांना आपली चूक लक्षात आली.

तैमूरच्या धाकट्या भावाचा फोटो शेअर केल्यानंतर काही क्षणातच तो रणधीर कपूर यांनी डिलीट केला. मात्र, नेटकऱ्यांनी हा फोटो डिलीट करण्यापूर्वीच त्या पोस्टचा स्क्रीनशॉट घेतला होता, जो आता वेगाने व्हायरल होत आहे (Kareena Kapoor Baby Boy photo Randhir Kapoor Accidently share on social media).

तैमूरच्या भावाच्या फोटोचा हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रणधीर कपूर यांनी तैमूरच्या धाकट्या भावाचा हा फोटो शेअर केला आहे. करीनाच्या धाकट्या लेकाचे फोटो पाहून चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे.

करीना कामावर परतली!

एका महिन्याच्या प्रसूतीच्या रजेनंतर करीनाने पुन्हा एकदा काम सुरू केले आहे. अलीकडेच करीना कपूर शूटसाठी सेटवर दिसली होती. करीना ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती आमीर खानबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. करीनाने गर्भावस्थेपूर्वी ‘गुड न्यूज’ या चित्रपटात काम केले होते.

दुसरीकडे, सैफ अली खानने देखील ‘आदिपुरुष’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात प्रभास ‘भगवान राम’, कृती सेनॉन ‘देवी सीता’ आणि सैफ ‘रावण’ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सैफ, राणी मुखर्जीसोबत ‘बंटी और बबली 2’मध्ये देखील दिसणार आहे.

(Kareena Kapoor Baby Boy photo Randhir Kapoor Accidently share on social media)

हेही वाचा :

‘तारक मेहता…’चा कलाकार सट्ट्यात हरला 30 लाख रुपये, कर्ज फेडण्यासाठी केली चेन स्नॅचिंग!

Milind Soman : अभिनेता मिलिंद सोमनची कोरोना चाचणी अखेर निगेटिव्ह, पत्नी अंकिताचे मानले आभार

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.