Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laal Singh Chaddha:’लाल सिंह चड्ढा’च्या बॉयकॉटवर करीनानेही सोडलं मौन, म्हणाली “दुर्लक्ष करणं शिकलं पाहिजे नाहीतर..”

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ट्विटरवर वेळोवेळी 'बॉयकॉट लाल सिंग चड्ढा' हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. नुकतंच आमिरने चित्रपटाविरोधात झालेल्या निदर्शनांबद्दल दु:ख व्यक्त केलं.

Laal Singh Chaddha:'लाल सिंह चड्ढा'च्या बॉयकॉटवर करीनानेही सोडलं मौन, म्हणाली दुर्लक्ष करणं शिकलं पाहिजे नाहीतर..
Laal Singh ChaddhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 9:43 AM

अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट येत्या 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला सोशल मीडियावर जोरदार विरोध होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ट्विटरवर वेळोवेळी ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. नुकतंच आमिरने चित्रपटाविरोधात झालेल्या निदर्शनांबद्दल दु:ख व्यक्त केलं. त्याचवेळी आता करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) बॉलिवूडमधील ‘कॅन्सल कल्चर’वर आपलं मत मांडलं आहे. करीना म्हणाली, “आजकाल प्रत्येकाचं स्वतःचं मत असू शकतं, पण एक चांगला चित्रपट कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतो यावर माझा विश्वास आहे.”

काय म्हणाली करीना?

करीनाने नेटकऱ्यांना तिच्या चित्रपटाला विरोध न करण्याची विनंती केली आहे. ती पुढे म्हणाली, “कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. तो चित्रपट आधी थिएटरमध्ये जाऊन पहा. आजच्या काळात प्रत्येकाचं मत वेगळं असतं. आज प्रत्येकाला आपला आवाज आहे. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामुळे आता असं होणार असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकावं लागेल. अन्यथा तुमचं जगणं कठीण होईल आणि म्हणूनच मी अशी कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही.”

मला जे पोस्ट करायचे आहे ते मी पोस्ट करते असंही करीना कपूर म्हणाली. “जर तो चांगला चित्रपट ठरला तर मला खात्री आहे की तो इतर कोणत्याही गोष्टीला (विरोधाला) मागे टाकेल आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल”, असा विश्वास तिने व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

आमिरची प्रतिक्रिया-

आमिर खाननेही सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘बॉयकॉट लाल सिंह चड्ढा’ ट्रेंडवर आपलं मत व्यक्त केलं. आमिर म्हणाला, “जेव्हा लोक बॉलिवूड आणि लाल सिंग चड्ढावर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. विशेषत: जेव्हा लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी करतात, कारण त्यांना वाटतं की मी अशा लोकांच्या यादीत आहे ज्यांना भारत आवडत नाही. पण हे खरं नाही. काही लोक असा विचार करतात हे दुर्दैवी आहे. कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. तो थिएटरमध्ये जाऊन एकदा पहा.”

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.