Kareena Kapoor: करीना कपूरने सांगितलं ‘त्या’ व्हायरल फोटोमागचं सत्य; गरोदर नव्हे तर या कारणामुळे दिसलं पोट

फॅमिली व्हेकेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि करीनाचा तो फोटो पाहून चाहते थक्क झाले होते. यामागचं कारण म्हणजे त्या फोटोमध्ये दिसणारा करीनाचा बेबी बंप. करीना तिसऱ्यांदा प्रेग्नंट (Pregnancy) आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता.

Kareena Kapoor: करीना कपूरने सांगितलं त्या व्हायरल फोटोमागचं सत्य; गरोदर नव्हे तर या कारणामुळे दिसलं पोट
Kareena Kapoor Khan
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 12:43 PM

अभिनेत्री करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) लंडन ट्रिपमधील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि तैमुर, जेह या आपल्या दोन मुलांसोबत ती लंडनला फिरायला गेली होती. या ट्रिपचे फोटोसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत होती. मात्र या फॅमिली व्हेकेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि करीनाचा तो फोटो पाहून चाहते थक्क झाले होते. यामागचं कारण म्हणजे त्या फोटोमध्ये दिसणारा करीनाचा बेबी बंप. करीना तिसऱ्यांदा प्रेग्नंट (Pregnancy) आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. त्या व्हायरल फोटोबाबत करीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

करीना तिसर्‍यांदा आई होणार असल्याची चर्चा

सोशल मीडियावरील करीनाच्या प्रेग्नंसीवरून होणारी चर्चा पाहता आधी तिने इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहित त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. ‘पास्ता आणि वाईनमुळे माझं पोट फुगल्यासारखं वाटत होतं आणि सैफ म्हणतोय की त्याने लोकसंख्या वाढीसाठी आधीच भरपूर योगदान दिलंय’, अशी उपरोधिक पोस्ट लिहित तिने प्रेग्नंसीच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण आता करीनाने त्या फोटोमागील वेगळंच सत्य नेटकऱ्यांसमोर आणलं आहे.

व्हायरल फोटोमागचं सत्य

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करीनाने सांगितलं की, तो फोटो मॉर्फ करण्यात आला होता आणि तिने तो फोटो फक्त मनोरंजनासाठी पोस्ट केला होता. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली “त्या फोटोमध्ये ती 6 महिन्यांची प्रेग्नंट दिसत होती.”

करीना सध्या तिच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामध्ये ती आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट हॉलिवूड सुपरहिट चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात टॉम हँक्स मुख्य भूमिकेत दिसला होता. अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा या चित्रपटात करीना कपूर आणि आमिर खानशिवाय नाग चैतन्य आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.