Kartik Aaryan: ‘भुल भुलैय्या 2’च्या यशानंतर कार्तिक आर्यनने वाढवलं मानधन? उत्तर वाचून तुम्हीही हसाल!

या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता 150 कोटींकडे वाटचाल सुरू आहे. चित्रपटाला इतकं घसघशीत यश मिळाल्यानंतर आता कार्तिकने त्याच्या मानधनात (Fees) वाढ केल्याची चर्चा सुरू झाली.

Kartik Aaryan: 'भुल भुलैय्या 2'च्या यशानंतर कार्तिक आर्यनने वाढवलं मानधन? उत्तर वाचून तुम्हीही हसाल!
Kartik AaryanImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 10:59 AM

अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता 150 कोटींकडे वाटचाल सुरू आहे. चित्रपटाला इतकं घसघशीत यश मिळाल्यानंतर आता कार्तिकने त्याच्या मानधनात (Fees) वाढ केल्याची चर्चा सुरू झाली. एखादा चित्रपट हिट ठरला की कलाविश्वात कलाकाराचा भाव वधारतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे कार्तिकनेही ‘भुल भुलैय्या 2’नंतर आपलं मानधन वाढवल्याचं म्हटलं जातंय. या सर्व चर्चांवर खुद्द कार्तिकनेच ट्विटरवर उत्तर दिलं आहे. एका वेबसाईटने त्याच्या मानधनाविषयी ट्विट केलं होतं. त्याला कार्तिकने आपल्याच मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे.

‘भुल भुलैय्या 2 च्या यशानंतर कार्तिकने त्याची फी वाढवली आहे’, असं ते वृत्त होतं. त्यावर ट्विट करत कार्तिकने लिहिलं, ‘प्रमोशन झालंय आयुष्यात, पगारवाढ नाही. तथ्यहीन’. कार्तिकच्या या उत्तरावर अनेकांनी कमेंट्स केले आहेत. ‘मानधन वाढवण्यात काही गैर नाही, तू तसं काम केलंस’, असं एकाने लिहिलंय. तर काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

वाचा उत्तर-

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

भुल भुलैय्या 2 हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये कार्तिकसह कियारा अडवाणी आणि तब्बूचीही भूमिका आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 122.69 कोटींचा गल्ला जमवला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये पहिल्याच दिवशी दमदार कमाई करणाऱ्यांमध्ये ‘भुल भुलैय्या 2’चा समावेश झाला आहे. कार्तिक आर्यनच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाला ‘भुल भुलैय्या 2’ने मागे टाकलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.