कतरिनाच्या हातून निसटल्या आणि दीपिकाच्या पदरी पडल्या, ‘या’ सुपरहिट फिल्म्सनी चमकले नशिबाचे तारे!

दीपिका पदुकोणचे काही सुपरहिट चित्रपट प्रथम कतरिना कैफला ऑफर करण्यात आले होते. पण तिने हे चित्रपट करण्यास नकार दिला, त्यानंतर ते दीपिका पदुकोणच्या पदरी पडले. या चित्रपटांनी दीपिकाच्या कारकिर्दीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

कतरिनाच्या हातून निसटल्या आणि दीपिकाच्या पदरी पडल्या, ‘या’ सुपरहिट फिल्म्सनी चमकले नशिबाचे तारे!
कतरिना कैफ-दीपिका पदुकोण
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 11:20 AM

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. कतरिना कैफ ही सर्वच दिग्दर्शकांची पहिली पसंती आहे. प्रेक्षक देखील तिचे सर्व चित्रपट खूपच एन्जॉय करतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की, कतरिना कैफला काही सुपरहिट चित्रपटांची ऑफर देण्यात आली होती. जर कतरिनाने या चित्रपटांना नकार दिला नसता, तर कदाचित ती आज एका वेगळ्या वलयात दिसली असती (Katrina Kaif rejects these super hit films later deepika padukone cast for the same).

मात्र, कतरिना कैफमुळे दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिला असे काही चित्रपट मिळाले, ज्यामुळे तिच्या करिअरला गती मिळाली. दीपिका पदुकोणचे काही सुपरहिट चित्रपट प्रथम कतरिना कैफला ऑफर करण्यात आले होते. पण तिने हे चित्रपट करण्यास नकार दिला, त्यानंतर ते दीपिका पदुकोणच्या पदरी पडले. या चित्रपटांनी दीपिकाच्या कारकिर्दीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

चेन्नई एक्सप्रेस

शाहरुख खान अभिनित चेन्नई एक्सप्रेस हा सुपरडूपर हिट ठरला. या चित्रपटात दीपिका पदुकोणच्या ‘मीनम्मा’ या व्यक्तिरेखेला खूप पसंती मिळाली होती. पण दीपिका या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती. या चित्रपटात निर्मात्यांना शाहरुखसोबत कतरिना कैफला कास्ट करायचे होते. एमटीव्हीइंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी भाषा आणि लकबीमुळे कतरिना कैफने नकार दिला. यानंतर हा चित्रपट दीपिकाला मिळाला आणि तिने तिच्या पात्रातून चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले (Katrina Kaif rejects these super hit films later deepika padukone cast for the same).

बाजीराव मस्तानी

दीपिका पादुकोणच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाने तर इतिहास रचला. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाची ऑफर पहिल्यांदा कतरिनाला देण्यात आली होती, पण तिने नकार दिला. या वृत्तानुसार संजय लीला भन्साळींना पुन्हा एकदा ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात सलमान खान-ऐश्वर्यासारखी जादू हवी होती. पण दोघांच्या ब्रेकअपमुळे ते कठीण झाले. त्यानंतर दिग्दर्शकांनी रणवीर सिंगसोबत कतरिना कैफला कास्ट करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अभिनेत्रीने तिच्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्याबरोबर रोमान्स करण्यास नकार दिला आणि हा चित्रपट पुन्हा दीपिकाच्या हाती लागला.

ये जवानी है दीवानी

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांचा ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती. हा चित्रपटही सुरुवातीला कतरिनाला ऑफर करण्यात आला होता. या चित्रपटात कतरिना रणबीरसोबत रोमांस करताना दिसणार होती. परंतु, दोघांमध्ये काही बिनसल्याने ही जोडी पडद्यावर एकत्र आली नाही.

(Katrina Kaif rejects these super hit films later deepika padukone cast for the same)

हेही वाचा :

Puglya | मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान, ‘पगल्या’ला तुर्की-ओन्कोमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार!

‘बिग बॉस’ स्पर्धक अभिनेत्रीच्या मनात यायचे आत्महत्येचे विचार, ‘अशा’प्रकारे केली नैराश्यावर मात!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.