Phone Bhoot New Poster | कतरिना कैफच्या ‘फोन भूत’ चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली!

कतरिना कैफचा चित्रपट फोन भूत आता 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये मोठा बदल करण्यात आलायं.

Phone Bhoot New Poster | कतरिना कैफच्या 'फोन भूत' चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली!
Image Credit source: इंस्टाग्राम
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 11:53 AM

मुंबई : कतरिना कैफचा (Katrina Kaif) स्टारर चित्रपट ‘फोन भूत’ हा पुन्हा एकदा चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाशी संबंधित एक मोशन पोस्टर शेअर करण्यात आले आहे. फोन भूत चित्रपटाचे नवीन पोस्टर आल्यानंतर त्याच्याशी संबंधित एक नवीन अपडेट देखील शेअर करण्यात आलीयं. चित्रपटाच्या (Movie) प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटाचे जे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले आहे ते केवळ धक्कादायकच नाही तर मजेशीरही आहे. या पोस्टरसोबतच चित्रपटाची रिलीज डेटही (Release date) जाहिर करण्यात आल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढलीयं.

इथे पाहा कतरिना कैफने शेअर केलेले पोस्ट

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

फोन भूत चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार

कतरिना कैफचा चित्रपट फोन भूत आता 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये मोठा बदल करण्यात आलायं. आज अभिनेत्री कतरिना कैफचा वाढदिवस आहे. या दिवशी चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कतरिनाने त्याच्या रिलीजबद्दल सांगितले आहे. कतरिना कैफशिवाय या चित्रपटात ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे देखील मुख्य भूमिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर केले

या चित्रपटाबद्दल इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना कतरिनाने लिहिले की, चित्रपटाबद्दल नवीन अपडेट्स येत आहेत. फोन भूत तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. फोन भूत चित्रपटाची घोषणा वर्षभरापूर्वी करण्यात आली होती आणि त्यानंतर केवळ चित्रपटाच्या पोस्टरबद्दल आणि त्याच्याशी संबंधित इतर माहितीबद्दल प्रेक्षक उत्सुक होते. कतरिना, सिद्धांत आणि ईशान पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तरची प्रोडक्शन कंपनी करत आहे.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.