Death Anniversary | धार्मिक चित्रपट करणं निरुपा रॉय यांच्या करिअरला ठरलं बाधक, पाहा कशी झाली होती बॉलिवूडमध्ये एंट्री…

गुजरातच्या वलसाड शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निरुपा रॉय (Nirupa Roy) यांनी बॉलिवूडमध्ये आईचे पात्र अतिशय खास बनवले. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 275 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आज जरी निरुपा या जगात नसल्या तरी त्यांच्या अभिनयाचे उदाहरण नेहमीच दिले जाईल.

Death Anniversary | धार्मिक चित्रपट करणं निरुपा रॉय यांच्या करिअरला ठरलं बाधक, पाहा कशी झाली होती बॉलिवूडमध्ये एंट्री...
Nirupa Roy
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 1:20 PM

मुंबई : गुजरातच्या वलसाड शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निरुपा रॉय (Nirupa Roy) यांनी बॉलिवूडमध्ये आईचे पात्र अतिशय खास बनवले. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 275 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आज जरी निरुपा या जगात नसल्या तरी त्यांच्या अभिनयाचे उदाहरण नेहमीच दिले जाईल.

13 ऑक्टोबर 2004 रोजी या प्रसिद्ध अभिनेत्रीने या जगाचा कायमचा निरोप घेतला. निरुपा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या होत्या, पण ज्या प्रकारे त्यांनी चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली ते खरोखर कौतुकास्पद आहे.

पतीमुळे चित्रपटांमध्ये प्रवेश

असे म्हटले जाते की, निरुपा रॉय यांच्या पतीला चित्रपटांची खूप आवड होती आणि त्यांना अभिनेता व्हायचे होते. अशा परिस्थितीत, एकदा ते पत्नी निरुपासोबत बी.एम. व्यास यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी निरुपा यांच्या पतीला काम देण्यास नकार दिला, पण त्यांनी सांगितले की त्यांची पत्नी चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम मिळवू शकते. अशाप्रकारे ‘रनकदेवी’ चित्रपटात निरुपा रॉय यांना पहिली संधी मिळाली.

गुजराती चित्रपटांमध्येही दिसली जादू

चित्रपटांच्या जगातील तेजस्वीपणा पलीकडे, निरुपा एक संवेदनशील व्यक्ती होत्या. हेच कारण आहे की, चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही, निरुपा रॉय यांच्या सामान्य जीवनातील साधेपणा चित्रपटानंतरही त्यांच्या प्रेक्षकांना त्यांच्याशी जोडत राहिला. तसे, आम्ही तुम्हाला सांगू की, निरुपा यांनी गुजराती चित्रपटांमध्ये देखील आपली जादू दाखवली होती. त्यांनी “रनकदेवी” या गुजराती चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पडली होती. निरुपा यांना त्यांची खरी ओळख 1953 मध्ये आलेल्या “दो बिघा जमीन” या चित्रपटातून मिळाली.

धार्मिक चित्रपटांमध्ये केले काम

1940 आणि 50च्या दशकात निरुपा रॉय यांनी अनेक धार्मिक चित्रपट केले, ज्यामुळे त्यांची कारकीर्द त्या वेळी इतकी प्रभावित झाली की, त्यांना चित्रपट पडद्यावर देवीची, आईची भूमिका देऊ केली जात होती. हेच कारण आहे की, वयाच्या आधीच त्यांनी मोठ्या स्टार्सच्या आईची भूमिका साकारण्यास सुरुवात केली.

चित्रपटांतील आई

निरुपा रॉय यांनीही आईची भूमिका साकारून एक वेगळाच अध्याय रचला. एकेकाळी त्या पडद्यावर अमिताभ बच्चनच्या आई म्हणून ओळखल्या जात असत. दीवार, रोटी, अंजाना, खून पसीना, सुहाग, इन्कलाब, मुकद्दर का सिकंदर, मर्द या चित्रपटांमध्ये निरुपा यांची भूमिका पाहायला मिळाली.

तारुण्य सरल्यावर मिळाले यश

दूरदर्शनवर प्रसारित झालेला टॉक शो ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या मुलाखतीदरम्यान निरुपा रॉय म्हणाल्या की, मी सर्व प्रकारच्या चित्रपटांत काम केल्यामुळे मला खूप आनंद झाला. मग ते सामाजिक, ऐतिहासिक किंवा पौराणिक कोणतेही चित्रपट असोत. त्यांनी 40 पौराणिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्याचेही सांगितले होते, जी एक विक्रम नोंद आहे. अशा पौराणिक चित्रपटांमध्ये फारच कमी अभिनेत्रींनी काम केले असेल.

तथापि, निरुपा रॉय यांना तारुण्यात जितकी प्रसिद्धी मिळाली नाही, तितकीच ती नंतर आईची भूमिका साकारून मिळाली. निरुपा रॉय स्वत: म्हणत असत की, वयस्कर झाल्यानंतर कलाकार निवृत्त होतो, परंतु हे माझ्या बाबतीत घडले नाही. मी जसजशी मोठी होत गेले, तसतशी मी अधिक व्यस्त झाले. विशेषत: जेव्हा मला हिंदी सिनेमाच्या सुपरस्टार्सची आई साकारायला मिळाली. निरुपा रॉय यांची यशस्वी कारकीर्द होती. चित्रपटांमधून आईची भूमिका साकारणाऱ्या निरुपा रॉय यांना 2004 साली हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा :

Aryan Khan bail hearing | आर्यनच्या जामिनासाठी मोठी खटपट, पुन्हा एकदा होणार जामीन अर्जावर सुनावणी

बाळाचं आगमन, लग्नाची चर्चा, आता नुसरत जहाँ-यश दासगुप्ताचं रोमँटिक फोटोशूट चर्चेत! पाहा फोटो…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.