काळ्या गाऊनवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाने झापलं; “हेच हॉलिवूड सेलिब्रिटींनी केलं असतं तर..”

वयाची पंचेचाळिशी ओलांडल्यानंतरही अत्यंत फिट दिसणारी, फॅशन सेन्सच्या बाबतीत तरुणाईलाही टक्कर देणारी बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood) मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडिया नेहमीच चर्चेत असते. मलायकाचं खासगी आयुष्य सोशल मीडियावर जितकं चर्चेत असतं, तितकीच चर्चा तिच्या फॅशनेबल कपड्यांची होत असते.

काळ्या गाऊनवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाने झापलं; हेच हॉलिवूड सेलिब्रिटींनी केलं असतं तर..
Malaika Arora Image Credit source: Instagram/ Varinder Chawla
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 5:49 PM

वयाची पंचेचाळिशी ओलांडल्यानंतरही अत्यंत फिट दिसणारी, फॅशन सेन्सच्या बाबतीत तरुणाईलाही टक्कर देणारी बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood) मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडिया नेहमीच चर्चेत असते. मलायकाचं खासगी आयुष्य सोशल मीडियावर जितकं चर्चेत असतं, तितकीच चर्चा तिच्या फॅशनेबल कपड्यांची होत असते. गेल्या महिन्यात तिने फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Farhan Shibani Wedding) यांच्या लग्नाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत मलायकाने तिच्या लूकने सर्वांनाच घायाळ केलं होतं. यावेळी मलायकाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर शिअर गाऊन परिधान केला होता. करीना कपूर, करिष्मा कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासोबत पोझ देतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी कपड्यांवरून मलायकाला ट्रोल करण्यात आलं होतं. त्या ट्रोलर्सना मलायकाने आता उत्तर दिलं आहे.

जेनिफर लोपेझ किंवा रिहाना यांसारख्या हॉलिवूड सेलिब्रिटींच्या अंगावर त्यांना असे कपडे आवडले असते. पण भारतीय सेलिब्रिटींनी तसे कपडे परिधान केले की त्यांना उगाच ट्रोल केलं जातं, असं मलायका म्हणाली. पिंकविलाला दिलेल्या या मुलाखतीत मलायका म्हणाली, “ते कपडे माझ्यावर खूप सुंदर दिसत होते. मी दुसऱ्यांचा विचार करत नाही. टीका करणारे, ट्रोल करणारे लोक दुतोंडी असतात असं मला वाटतं. रिहाना, जेनिफर किंवा बेयोन्से यांनी तसे कपडे परिधान केले असते, तर लोकांना ते आवडलं असतं. तीच गोष्ट तुम्ही इथे केली, तर लोकांच्या भुवया उंचावतात. ती काय करतेय, ती आई आहे, ती अशी आहे, ती तशी आहे, असे लोक सुनावतील. असं दुतोंडी का वागायचं? एखादी गोष्ट कौतुकास्पद असेल तर खुल्या मनाने त्याचं कौतुक करा. असा विरोधाभास का?”

“ट्रोलिंगचा परिणाम माझ्यावर होतो. जे लोक म्हणत असतील की त्यांच्यावर परिणाम होत नाही, तर ते मस्करी करत असतील किंवा खोटं बोलत असतील. पण अशा कमेंट्सचा त्रास होतो”, असंदेखील ती म्हणाली. फरहान-शिबानीच्या पार्टीला हजेरी लावलेल्या मलायकाच्या गर्ल्स-गँगची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.

हेही वाचा:

‘झुंड’ची आठवड्याची कमाई; बॉक्स ऑफिसवर जादू कायम!

प्रभासचा बिग बजेट चित्रपट कथेच्या बाबतीत ठरला कमकुवत!

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.