अरजाब खान याच्यासोबत घटस्फोट घेणे ‘मलायका अरोरा’साठी नव्हते सोपे, अखेर अभिनेत्रीने सांगितले…
अचानक मलायका आणि अरबाज यांनी घटस्फोट घेत सर्वांना मोठा धक्काच दिला होता.
मुंबई : मलायका अरोरा हिने अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती प्रचंड चर्चेत आली. अचानक मलायका आणि अरबाज यांनी घटस्फोट घेत सर्वांना मोठा धक्काच दिला होता. मलायका आणि अरबाज यांचा अरहान नावाचा एक मुलगा आहे. यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मलायका तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघे कायमच सोबत स्पाॅट देखील होतात.
तब्बल 5 वर्षांनंतर घटस्फोट घेताना आपल्या मनामध्ये काय विचार सुरू होते आणि परिस्थिती नेमकी काय होती हे सर्व मयालकाने अखेर सांगितले आहे. हा घटस्फोट घेणे माझ्यासाठी खूप सोपे नसल्याचे मलायकाने सांगितले आहे. यादरम्यानचा सर्व अनुभव मलायकाने चाहत्यांसोबत शेअर केलाय.
मलायका म्हणाली की, घटस्फोट घेताना माझ्या मनात अनेक प्रश्न सुरू होते. कारण हा फक्त माझा आणि अरबाजचाच घटस्फोट नव्हता तर यामध्ये आमचे दोन्ही कुटुंब होते. मला त्यावेळी खूप जास्त फॅमिली प्रेशर नक्कीच होते. विषय आमच्या मुलाचा देखील होता.
आम्ही जरी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेताना होता, परंतू आमचा मुलगा अरहान खान हा यासर्व गोष्टी कशाप्रकारे हाताळणार हे विचार माझ्या मनात सतत सुरू असायचे. कारण आज आपल्याला वाटत असेल की, आपला समाज खूप जास्त पुढे गेला आहे.
परंतू एखादी महिला घटस्फोटीत असेल तर तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघितले जाते. त्यामुळे घटस्फोटाचा निर्णय माझ्यासाठी खूप अवघड होता. मात्र, मला असे वाटते की, महिलांनी जगाचा विचार न करता आपल्याला जे योग्य वाटते तेच करायचा हवे.
अरबाज खानसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोराचे नाव हे अभिनेता अर्जुन कपूरसोबत सोडले जात होते. मलायका आणि अर्जुन गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघे नेहमीच सोबत फिरायला जातात. इतकेच नव्हे तर मलायका लवकरच अर्जुन कपूर सोबत लग्न करणार असल्याच्या देखील चर्चा आहेत.