Video : Nach Meri Raniवर आई-मुलाच्या जोडीचा जबरदस्त डान्स, नोरा फतेहीही होईल प्रभावित

गायक गुरू रंधावा (Guru Randhawa) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्या 'नाच मेरी रानी' या गाण्यावर आई-मुलाची जोडी धुमाकूळ घालतेय. आई-मुलाचा डान्स (Dance) इतका जबरदस्त आहे, की खुद्द नोरा फतेहीही ते पाहून खुश होईल.

Video : Nach Meri Raniवर आई-मुलाच्या जोडीचा जबरदस्त डान्स, नोरा फतेहीही होईल प्रभावित
आई-मुलाचा डान्स
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 3:31 PM

Mother-Son Dance : गायक गुरू रंधावा (Guru Randhawa) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्या ‘नाच मेरी रानी’ या गाण्यावर आई-मुलाची जोडी आजकाल इंटरनेटवर धुमाकूळ घालतेय. आई-मुलाचा डान्स (Dance) इतका जबरदस्त आहे, की खुद्द नोरा फतेहीही ते पाहून खुश होईल. व्हिडिओमध्ये दोघांचाही उत्साह पाहण्यासारखा आहे. व्हिडिओमध्ये फक्त मुलगाच नाही तर आईही जबरदस्त डान्स करताना दिसतेय. ‘नाच मेरी रानी’ या गाण्यावर आपल्याला अनेक व्हिडिओ आतापर्यंत पाहायला मिळाले असतील. हे सर्वच व्हिडिओ आपलं मनोरंजन करतात. एका शाळकरी मुलीचा या गाण्यावरचा डान्सही नुकताच व्हायरल झाला होता. आता आई आणि मुलाचा डान्स करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

आई-मुलाच्या जोडीला प्रचंड पसंती

व्हायरल व्हिडिओमध्ये आई-मुलाची जोडी ‘नाच मेरी रानी’ गाण्यावर स्टेप-टू-स्टेप डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूपच रियालिस्टिक आहे. सोशल मीडिया यूझर्सही आई-मुलाच्या जोडीला प्रचंड पसंती देत ​​आहेत. हा व्हिडिओ आईनं तिच्या lohi_ravi इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे, की त्याला आतापर्यंत 11 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

यूझर्सकडून कौतुक

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की काळा शर्ट घातलेला मुलगा आणि हिरवी साडी परिधान केलेली आईसोबत एकदम जबरदस्त डान्स करत आहे. साडीत आई करत असलेला डान्स पाहून लोक कौतुक करत आहेत. या दोघांनी याआधीही अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. आईचा फिटनेस पाहून तुम्हालाही वाटणार नाही, की तो तिचा मुलगा आहे.

सोशल मीडियावर होतं लोकप्रिय

जेव्हा-जेव्हा नोरा फतेहीचं गाणं येतं, तेव्हा ते सोशल मीडियावर लोकप्रिय होतं. लोक तिच्या गाण्यांवर डान्सचे व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतंच आलेलं तिचं ‘नाच मेरी रानी’ हे गाणंही खूप धमाल करत आहे. या गाण्यावर लोक जोरदार रील्स बनवत आहेत आणि सोशल मीडियावर या गाण्याच्या अनेक डान्स व्हिडिओंचा बोलबाला आहे.

Video : गोरखा जवानाचा पारंपरिक खुकरी डान्स सोशल मीडियावर Viral

Video : स्वतःच्याच लग्नात पैसे लुटायला लागले वधू-वर; यूझर्स म्हणतायत, सर्व 36 गुण जुळले बहुतेक!

Viral : संकटातही विचलित न होता कसं पडायचं बाहेर? या Videoतून खूप काही शिकायला मिळेल

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.