Movies Release Date : चित्रपटगृहांमध्ये धमाल करण्यासाठी बॉलिवूड अभिनेते तयार, पाहा 2021 ते 2023पर्यंत रिलीज होणाऱ्या चित्रपटांची संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स उघडण्याच्या घोषणेनंतर, सर्व निर्माते त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास उत्सुक आहेत. प्रत्येकाने आपापल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

Movies Release Date : चित्रपटगृहांमध्ये धमाल करण्यासाठी बॉलिवूड अभिनेते तयार, पाहा 2021 ते 2023पर्यंत रिलीज होणाऱ्या चित्रपटांची संपूर्ण यादी
Movie Release date
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 11:16 AM

मुंबई : महाराष्ट्रातील सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स उघडण्याच्या घोषणेनंतर, सर्व निर्माते त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास उत्सुक आहेत. प्रत्येकाने आपापल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 ऑक्टोबरपासून सर्व सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्स उघडण्याची घोषणा केली आहे. बॉलिवूड इंडस्ट्री या घोषणेने खूप खूश आहे. कारण प्रत्येकजण आपले चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यासाठी बराच काळ वाट पाहत होता. दुसरीकडे, रविवारी, अनेक निर्मात्यांनी आणि कलाकारांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली, जे आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

अभिनेता अक्षय कुमार, रणवीर सिंग, प्रभास सारख्या स्टार्सचे चित्रपट देखील या यादीत समाविष्ट आहेत. त्याच वेळी, व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आता 2021, 2022 आणि 2023 च्या सर्व चित्रपटांची यादी पोस्ट केली आहे. तर या सूचीच्या माध्यमातून तुम्हाला सर्व चित्रपटांच्या रिलीजची तारीख कळेल आणि जेव्हा तुम्हाला बघायचे असेल, तेव्हा तुम्ही ही यादी बघून कोणत्या चित्रपटांची योजना करू शकता. पाहा कोणते चित्रपट कधी होणार रिलीज…

2021

  1. भवई : 1 ऑक्टोबर
  2. सूर्यवंशी : दिवाळी
  3. नो मीन्स नो : 5 नोव्हेंबर
  4. बंटी और बबली 2 : 19 नोव्हेंबर
  5. सत्यमेव जयते 2 : 26 नोव्हेंबर
  6. तड़प : 3 डिसेंबर
  7. चंडीगढ़ करे आशिकी : 10 डिसेंबर
  8. 83 : ख्रिसमस
  9. पुष्पा : पार्ट 1 : ख्रिसमस
  10. जर्सी : 31 दिसंबर

2022

  1. राधे श्याम: 14 जानेवारी
  2. पृथ्वीराज: 21 जानेवारी
  3. लाल सिंह चड्ढा: व्हॅलेंटाईन डे
  4. जयेशभाई जोरदार: 25 फेब्रुवारी
  5. बच्चन पांडे: 4 मार्च
  6. शमशेरा: 18 मार्च
  7. भूल भुलैया 2: 25 मार्च
  8. KGF 2: 14 एप्रिल
  9. मे डे : 29 एप्रिल
  10. हिरोपंती 2 : 6 मे
  11. रक्षाबंधन : 11 ऑगस्ट
  12. विक्रम वेधा रिमेक : 30 सप्टेंबर
  13. राम सेतू: दिवाळी 2022
  14. गणपत : 23 डिसेंबर

2023

फायटर : 26 जानेवारी

2023 च्या रिलीज डेटच्या यादीत फक्त ‘फायटर’चे नाव आहे कारण बहुतेक चित्रपट या वर्षी किंवा पुढच्या वर्षी रिलीज होतील.

‘भवाई’ ठरणार पहिला चित्रपट

या यादीनुसार, चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणारा पहिला चित्रपट म्हणजे ‘भवाई’. भवाई 10 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. ‘भवाई’ एक रोमँटिक ड्रामा आहे, ज्यामध्ये प्रतिक गांधी, इंद्रिता रे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे नाव आधी ‘रावण लीला’ असे होते, परंतु नावासंदर्भात झालेल्या वादानंतर या चित्रपटाचे नाव बदलून भवाई असे करण्यात आले.

दिवाळीला ‘सूर्यवंशी’

अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी यंदाची दिवाळी खूप खास असेल. कारण अभिनेत्याचा बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये रिलीज होणार होता, परंतु कोविडमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. यानंतर बऱ्याच वेळा असे वृत्त आले होते की, हा चित्रपट OTT वर रिलीज होईल, पण प्रत्येक वेळी ही अफवा ठरली होती आणि आता शेवटी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास तयार आहे.

तथापि, सूर्यवंशी व्यतिरिक्त ‘नो मीन्स नो’ देखील दिवाळीलाच रिलीज होत आहे. गुलशन ग्रोव्हर, एना अडोर, अरमान कोहली या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

Birthday Special : 53 वर्षांचा झाला राहुल देव, 18 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला करतोय डेट

Ranbir Kapoor Alia Bhatt : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पोहोचले जोधपूरला, लवकरच निघणार लग्नाचा मुहूर्त?

नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.
'देवाभाऊ अभिनंदन...',सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं, बघा काय म्हटलंय?
'देवाभाऊ अभिनंदन...',सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं, बघा काय म्हटलंय?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 28 दिवस उलटले, अद्याप 3 आरोपी फरार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 28 दिवस उलटले, अद्याप 3 आरोपी फरार.
सरपंच हत्या प्रकरणावरून टीका होत असताना धनंजय मुंडे स्पष्टच म्हणाले...
सरपंच हत्या प्रकरणावरून टीका होत असताना धनंजय मुंडे स्पष्टच म्हणाले....
भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?
भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?.
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?.
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.