14 वर्षांची असताना छेडछाड झाली, ती जखम अजूनही…; भूमी पेडणेकरचा मोठा खुलासा

Bollywood Actress Bhumi Pednekar about her Childhood life : प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा... बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने मोठा खुलासा केला आहे. 14 व्या वर्षी माझ्यासोबत छेडछाड झालेली त्याची जखम आजही मनावर कोरलेली आहे, असं भूमीने सांगितलं. वाचा सविस्तर...

14 वर्षांची असताना छेडछाड झाली, ती जखम अजूनही...; भूमी पेडणेकरचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 8:51 PM

मुंबई | 04 फेब्रुवारी 2024 : पारंपरिक स्क्रिप्टच्या पलिकडचे सिनेमे करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर… भूमी ठरलेल्या साचाच्या पलिकडचे सिनेमे निवडते. वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडते. तिच्या या कामाचं विशेष कौतुक केलं जातं. ती बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिने एका मुलखतीत तिने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. लहानपणी तिच्यासोबत छेडछाड झाल्याचं भूमी पेडणेकर हिने सांगितलं आहे. या घटनेचा तिच्यावर आजही परिणाम असल्याचं भूमीने सांगितलं. भूमी पेडणेकरचा भक्षक हा सिनेमा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भूमीचा एक इंटरव्ह्यूव झाला. या इंटरव्ह्यूवमध्ये तिने खुलासा केला आहे.

भूमीसोबत काय झालं होतं?

मला आजही तो दिवस लक्षात आहे. तेव्हा वांद्र्यात एक जत्रा भरली होती. मी तेव्हा खूपच लहान होती. तेव्हा मी 14 वर्षांची होते. मी माझ्या घरच्या लोकांसोबत या जत्रेत गेली होती. मी तेव्हा चालत होते. तेव्हा माझ्या पाठीवर कुणी तरी चिमटे घेत होतं. वारंवार मला हा स्पर्श केला जात होता. तेव्हा मला कळत होतं की माझ्यासोबत काय होत आहे. जेव्हा मी मागे वळून पाहिलं तर तेव्हा तिथं कुणी नव्हतं. तेव्हा माझ्यासोबत माझ्या बिल्डिंगमधली इतर मित्रमंडळी सुद्धा होती, असं भूमीने सांगितलं.

भूमी पेडणेकर नेमकं काय म्हणाली?

जेव्हा माझ्यासोबत ही गोष्ट घडली तेव्हा मी कुणाला काही बोलले नाही. कारण त्यावेळी मला खूप मोठा धक्का बसला होता. मला तेव्हा कळत नव्हतं की माझ्यासोबत नेमकं काय झालं आहे ते. पण तेव्हा मला झालेला स्पर्श मला आजही लक्षात आहे. कारण अशा गोष्टी तुमचं शरीर कधीही विसरत नाही. अशा गोष्टी घडल्याने तुमच्या आयुष्यावर आघात होतो. हा एक असा धक्का असतो. ज्यातून तुम्ही कधीही बाहेर येत नाही, असं भूमीने यावेळी सांगितलं.

भक्षक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

भूमीचा भक्षक हा सिनेमा येत्या नऊ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ही घटना एका सत्यकथेवर आधारित आहे. या सिनेमाच्या चित्रपटाने अंगावर काटा उभा राहतो. या सिनेमात भूमी एका महिला रिपोर्टरची भूमिका साकारते आहे. जी शेल्टर होमच्या नावाखाली मुलींवर होणारे गुन्ह्यांना उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.