शोमध्ये ‘नव्या नवेली नंदा’ने सांगून टाकले मामा अभिषेक बच्चन याचे सिक्रेट
जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा तिच्या व्हॉट द हेल नव्या या शोमुळे चर्चेत आहे.
मुंबई : जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया त्यांच्या बिनधास्त वागण्यामुळे ओळखल्या जातात. मात्र, त्यांच्या खासगी आयुष्यात कोणी दखल दिलेली त्यांना अजिबातच आवडत नाही. पापाराझी यांच्यासोबत तर त्यांचे नेहमीच खटके उडतात. अनेकदा लोक यामुळे जया बच्चन यांच्यावर टीका देखील करतात. जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा तिच्या व्हॉट द हेल नव्या या शोमुळे चर्चेत आहे. नुकताच नव्याच्या या शोमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन सहभागी झाल्या होत्या.
व्हॉट द हेल नव्या या शोमध्ये अनेकदा नव्या घरातील किसे सांगत असते. आता नव्याने थेट मामा अभिषेक बच्चनचे राज खोलून टाकले आहे. नव्याने काही महत्वाच्या गोष्टींचे खुलासे या शोमध्ये केले आहेत.
नव्या म्हणाली की, आमच्या फॅमिलीमध्ये आमच्यासाठी असे एक वातावरण तयार करण्यात आले आहे आम्ही कोणीही असो एकदम बिनधास्तपणे बोलू शकतो. यावर कोणीच काही आक्षेप घेत नाही.
एक वेळ आम्ही कोणत्या तरी विषयावर चर्चा करत होतो. त्यामध्ये थोडा वाद सुरू होण्यास सुरूवात झाली आणि मामाने (अभिषेक बच्चन) ने मोठ्या आवाजात गाणे सुरू केले.
नेहमीच जर काही विषयांवर वाद होण्याची चिन्हे ज्यावेळी दिसतात, त्यावेळी मामा गाणे लावतात. असे नव्या म्हणाली आहे. काही दिवसांपूर्वी नव्याने काैन बनेंगा करोडपती या शोमध्ये हजेरी लावली होती.
जया बच्चन यांचा काही दिवसांपूर्वी विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी त्या पापाराझीला चार वेळा पडत म्हणताना दिसल्या होत्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी जया बच्चन यांच्यावर टीका केली होती.