AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लोकं अन्नासाठी भटकतायत आणि तुम्ही पैसे उधळताय!’, ‘व्हेकेशन मोड’वर असलेल्या बॉलिवूडकरांना नवाजुद्दीनने फटकारले!

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, चित्रपटांचे शूटिंग थांबले असून, मुंबईत लॉकडाऊन झाला असल्याने अनेक कलाकार सुट्टीवर गेले आहेत. मात्र, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांनी त्या सेलेब्रिटींना चांगलेच फटकारले आहे.

‘लोकं अन्नासाठी भटकतायत आणि तुम्ही पैसे उधळताय!’, ‘व्हेकेशन मोड’वर असलेल्या बॉलिवूडकरांना नवाजुद्दीनने फटकारले!
नावाजुद्दीन सिद्दीकी
| Updated on: Apr 24, 2021 | 12:09 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, चित्रपटांचे शूटिंग थांबले असून, मुंबईत लॉकडाऊन झाला असल्याने अनेक कलाकार सुट्टीवर गेले आहेत. मात्र, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांनी त्या सेलेब्रिटींना चांगलेच फटकारले आहे. नवाजुद्दीन अशा बॉलिवूडकरांवर टीका करताना म्हणाला की, ‘लोकांना पोट भरण्यासाठी अन्न नाहीय आणि तुम्ही पैसे उधळत आहात. जरा तरी लाजवाटू द्या!’(Nawazuddin Siddiqui slams Bollywood celebrities who enjoying vacation trip in Maldives during corona pandemic)

वास्तविक, स्पॉटबॉयच्या अहवालानुसार नवाजुद्दीन यांना सेलेब्रिटींच्या व्हेकेशन ट्रीपची माहिती मिळाली आणि जेव्हा तिथून त्यांनी फोटो शेअर केले तेव्हा नवाजुद्दीन म्हणाला की, ‘ते लोक कशाबद्दल बोलतील? अभिनयाबद्दल? या लोकांनी मालदीवला एक तमाशा बनवले आहे. त्यांची पर्यटन उद्योगाशी काय व्यवस्था आहे हे मला माहिती नाही. पण माणूस म्हणून कृपया आपल्या सुट्टीतील फोटो आपल्याकडे ठेवा ही विनंती. प्रत्येकजण येथे या कठीण काळाला सामोरे जात आहे. कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. ज्यांना या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे, त्यांना हे फोटो दाखवून त्यांचा अपमान करू नका.

नवाजुद्दीन पुढे म्हणाला की, ‘आम्ही मनोरंजन करणारे लोक आहोत, आपल्याला थोडे मोठे झाले पाहिजे. जर बरेच लोक आपले अनुसरण करतात हे आपल्याला माहित आहे तर, आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.’ नवाजला, तुम्ही कधी मालदीवला जात आहात? असे विचारले असता तो म्हणाला की, ‘बिलकुल नाही, मी बुधाना येथे माझ्या कुटुंबासमवेत आहे. हेच माझे मालदीव आहे (Nawazuddin Siddiqui slams Bollywood celebrities who enjoying vacation trip in Maldives during corona pandemic).

स्वत:ला डिटॉक्स करण्यासाठी नवाझुद्दीन बेंगळुरुला!

काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनची पत्नी आलियाने सांगितले होते की, अभिनेत्याने स्वतःच्या तब्येतीकडे बरेच लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. ज्यामुळे ती खूप आनंदी आहे. कामातून ब्रेक घेऊन नवाजुद्दीनने स्वत:साठी वेळ काढला आहे. आलियाने सांगितले की, तो बंगळूरूमधील डीटॉक्स सेंटर येथे एका रिसॉर्टमध्ये होता, जिथे नवाजला जास्तीत जास्त प्रोटोकॉलमध्ये ठेवण्यात आले होते.

प्रोफेशनल लाईफ

नवाजुद्दीनच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, काही दिवसांपूर्वी त्यांचे ‘बारीश’ हे गाणे रिलीज झाले होते, जे बी.प्राक यांनी गायले होते. या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर, तमन्ना भाटियासह ‘तुम पे हम तो’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ‘बोले चुडिया’ या चित्रपटाचे आहे. यातील तमन्ना आणि नवाजुद्दीनची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली आहे.

(Nawazuddin Siddiqui slams Bollywood celebrities who enjoying vacation trip in Maldives during corona pandemic)

हेही वाचा :

सोनू सूदची कोरोनावर मात, आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच कंगना म्हणाली…

रहमाननं 25 गायिकांना ऐकलं पण मग बेलालाच का निवडलं? ऐका, बघा हा Video

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.