Neena Gupta : ‘चोली के पीछे क्या है’ गाण्याचा किस्सा, सुभाष घईंनी अंतर्वस्त्र बदलण्यास सांगितली, नीना गुप्तांचा दावा

‘बधाई हो’ फेम अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या त्यांचे आत्मचरित्र ‘सच कहूं तो’मुळे प्रचंड चर्चेत असून, त्यांचे हे पुस्तक सुपरहिट ठरले आहेत. यातील किस्से दररोज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या आत्मचरित्रात त्यांनी आई बनण्यापासून ते लग्नापर्यंतच्या प्रवासाची सगळी रहस्ये नीना गुप्तांनी उघड केली आहेत.

Neena Gupta : ‘चोली के पीछे क्या है’ गाण्याचा किस्सा, सुभाष घईंनी अंतर्वस्त्र बदलण्यास सांगितली, नीना गुप्तांचा दावा
नीना गुप्ता, सुभाष घई
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 11:52 AM

मुंबई : ‘बधाई हो’ फेम अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या त्यांचे आत्मचरित्र ‘सच कहूं तो’मुळे प्रचंड चर्चेत असून, त्यांचे हे पुस्तक सुपरहिट ठरले आहेत. यातील किस्से दररोज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या आत्मचरित्रात त्यांनी आई बनण्यापासून ते लग्नापर्यंतच्या प्रवासाची सगळी रहस्ये नीना गुप्तांनी उघड केली आहेत. अशा परिस्थितीत, आता या आत्मकथनात नीना गुप्ता यांनी आपल्या पुस्तकात दिग्दर्शक सुभाष घई यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे, ज्यात त्यांनी आपल्याला खूपच लाज वाटल्याचे म्हटले आहे (Neena gupta reveal that embarrassment after subhash ghai demanded padded bra for choli ke peeche song).

नीना गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे ऐकले, तेव्हा ते गाणे त्यांना खूप आवडले आणि त्यांनी तत्काळ त्या गाण्याला होकार दिला. नीना गुप्ता यांनी पुस्तकात लिहिले की, ‘गाण्यासाठी मला गुजराती बंजारा लूक करायचा होता आणि तसेच कपडे परिधान करायचे होते. या गाण्यासाठी असलेला वेश मी परिधान केला आणि त्यानंतर मला दिग्दर्शक सुभाष घई यांच्याकडे लूक टेस्टसाठी पाठवले गेले’.

…आणि सुभाष घई ओरडले!

सुभाष घई मला पाहताच ओरडले आणि म्हणाले की, ‘नाही नाही… यात काहीतरी भरा,’ हे ऐकून मला खूप लाज वाटली. मला माहित होते की, सुभाष घई माझ्या ‘चोळी’चा संदर्भ देत होते. मला माहित होते की, ती वैयक्तिक बाब नाही आणि गाणे तयार करण्यापूर्वी त्यांच्या मनात त्याची एक वेगळी प्रतिमा तयार झाली असावी.’

ते एक उत्तम दिग्दर्शक!

नीना गुप्ता यांनी पुढे लिहिले की, ‘दुसर्‍या दिवशी मला सुभाष घई यांच्यासमोर दुसर्‍या ड्रेसमध्ये नेण्यात आले. त्यावेळी मला वजनदार पॅड्स असलेली अंतर्वस्त्रे घालण्यासाठी देण्यात आली होती. यानंतरच माझा लूक फायनल झाला. सुभाष घई काय दाखवू इच्छित होते, याबद्दलच त्यांचे मत अगदी स्पष्ट आहे, म्हणूनच ते एक उत्तम दिग्दर्शक आहे.’

‘सच कहूं तो’मध्ये अनेक खुलासे!

फिल्म कंपेनियनच्या म्हणण्यानुसार, जेव्हा नीना गर्भवती होत्या, तेव्हा सतीश कौशिक त्यांच्याकडे गेले होते. सतीश नीनाचे खूप चांगले मित्र आहेत. ते नीनाला म्हणाले होते की, ‘तू काळजी करू नकोस, जर मुल डार्क त्वचेचे असेल, तर तू सांग की ते माझे आहे आणि आपण लग्न करु. कोणालाही काही कळणार नाही.’

अभिनेत्री नीना गुप्ता यांचे क्रिकेटर विव्हियन रिचर्ड्सबरोबर संबंध होते आणि त्यावेळी नीना गर्भवती राहिल्या होत्या. विव्हियनने नीनाशी लग्न केले नसले, तरी नीनाने लग्न न करता बाळाला या जगात आणण्याचे ठरवले होते. त्यानंतर नीनाने 2008मध्ये विवेक मेहराशी लग्न केले आणि दोघेही 13 वर्षांपासून एकत्र सुखी संसार करत आहेत.

(Neena gupta reveal that embarrassment after subhash ghai demanded padded bra for choli ke peeche song)

हेही वाचा :

सैफ-करीनाच्या दुसऱ्या लेकाला भेटायला पोहोचली सारा आली खान, तैमूरच्या भावाला बघून म्हणाली…

प्रेग्नंट नीना गुप्ताशी लग्न करण्यावर सतीश कौशिक यांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘लग्नासाठी विचारलं तेव्हा…’

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.