गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीवरून (South Film Industry) विविध मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. ‘पुष्पा’, ‘RRR’, ‘केजीएफ: चाप्टर 2’ यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनने दणक्यात कमाई करत बॉलिवूडकरांना झटका दिला. काही बॉलिवूड कलाकारांनीही या चित्रपटाचं आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीचं कौतुक केलं. तर दुसरीकडे अशा पद्धतीने फिल्म इंडस्ट्रीचं हिंदी आणि साऊथमध्ये विभाजन करू नका, असं अभिनेता अक्षय कुमार म्हणाला. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता अभिनेता रणवीर सिंगचं (Ranveer Singh) एक ट्विट चर्चेत आलं आहे. या ट्विटमध्ये रणवीरने कमल हासन (Kamal Haasan) यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत त्यांचं कौतुक केलं. कमल हासन यांच्या चाहत्यांना ही गोष्ट आवडली, मात्र काही नेटकऱ्यांनी रणवीरला चांगलंच धारेवर धरलं. आपल्याच इंडस्ट्रीतील चित्रपटांना पाठिंबा देण्याचं सोडून आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीत मैत्री शोधली जातेय, असा टोला त्याला नेटकऱ्यांनी लगावला.
रणवीरने कमल हासन यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. ‘माझा प्रतिभावान मित्र लोकेश आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार कमल हासन यांना शुभेच्छा. हा ट्रेलर जबरदस्त आहे’, अशा शब्दांत त्याने कौतुक केलं. रणवीरची ही पोस्ट क्षणार्धात व्हायरल झाली आणि त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या.
Cheers to my talented friend Lokesh @Dir_Lokesh and the Legend of Indian Cinema @ikamalhaasan ! This trailer is fire? https://t.co/w1ScXKUrrc
— Ranveer Singh (@RanveerOfficial) May 19, 2022
You have time to promote other industry film but u dont have a time to promote your indistry film #dhaakad
— venkateshpandi (@ManishRaisingh7) May 19, 2022
Now suddenly bollywood is founding friends in South. Paisa kamaaana hai patli awaaz ko
— anshraj (@sawrajsingh881) May 19, 2022
‘दुसऱ्या फिल्म इंडस्ट्रीचे चित्रपट प्रमोट करण्यासाठी तुझ्याकडे वेळ आहे, पण आपल्याच इंडस्ट्रीतील धाकड या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘इथे यांची बॉलिवूडची लंका जळतेय आणि हे टॉलिवूडला प्रमोट करायला निघालेत’ असा टोला दुसऱ्याने लगावला. बॉलिवूड कलाकारांना आता अचानक दाक्षिणात्य कलाकारांमध्ये मैत्री दिसतेय, असंही एका युजरने म्हटलंय. रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला अपेक्षित असा प्रतिसाद बॉक्स ऑफिसवर मिळाला नाही.