आर्यनच नाही तर ‘या’ बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा! पाहा कोण कोण यादीत सामील

शाहरुख खान अशा कलाकारांपैकी एक आहे, जो अनेकदा वाद टाळण्याचा प्रयत्न करतो. पण कोणाला वाटले होते की, शाहरुख खानचा मुलगा आर्यनला तुरुंगात जावे लागेल. अलीकडेच, NCB ने आर्यनसह 17 जणांना मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली.

आर्यनच नाही तर ‘या’ बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा! पाहा कोण कोण यादीत सामील
Aryan Khan
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 8:17 AM

मुंबई : शाहरुख खान अशा कलाकारांपैकी एक आहे, जो अनेकदा वाद टाळण्याचा प्रयत्न करतो. पण कोणाला वाटले होते की, शाहरुख खानचा मुलगा आर्यनला तुरुंगात जावे लागेल. अलीकडेच, NCB ने आर्यनसह 17 जणांना मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली. न्यायालयाने आर्यन खानला 14 दिवसांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामुळे केवळ शाहरुख खानलाच नाही तर संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडचे सर्व स्टार्स एकापाठोपाठ एक शाहरुखच्या घरी पोहोचत आहेत. पण सर्व प्रयत्नांनंतरही शाहरुख आपल्या मुलाला एनसीबीच्या पकडीतून बाहेर काढू शकत नाहीय. आज जाणून घेऊया अशाच काही बॉलिवूड स्टार किड्स बद्दल ज्यांनी जेलची हवा खाल्ली आहे.

आर्यन खान

शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली होती. आर्यनने एनसीबीच्या ताब्यात कबूल केले होते की, तो मागील 4 वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे. न्यायालयाने आर्यनचा जामीन नाकारला आहे.

सूरज पांचोली

अभिनेत्री जिया खानने 2013 साली गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, तिने मागे एक सुसाईड नोटही सोडली होती. जियाने सूरज पांचोलीवर शारीरिक शोषण करणे, तिला गर्भपात करण्यास भाग पाडणे असे गंभीर आरोप केले होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी सूरज पांचोलीला अटक केली. त्यानंतर त्याला तुरुंगात जावे लागले. मुंबई उच्च न्यायालयाने मात्र सूरजला दिलासा देत म्हटले की, तो जियाच्या आत्महत्येला जबाबदार नाही. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू आहे.

संजय दत्त

1993 मध्ये संजय दत्तला विमानतळावरून अटक करण्यात आली होती. पोलिसांना त्याच्या घरातून अवैध शस्त्र मिळाल्याने ही अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्याला टाडा आणि आर्म्स अॅक्ट अटक करण्यात आली. या प्रकरणात 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती, जी नंतर कमी करून तीन वर्ष करण्यात आली. 2013 पासून संजय दत्त पुण्याच्या येरवडा कारागृहात होता आणि 2016 मध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका झाली.

सलमान खान

2002 मध्ये सलमान खानची कार वांद्रेच्या फुटपाथवर चढली. यादरम्यान, त्याच्या कारखाली चिरडून एका मजुराचा मृत्यू झाला आणि चार लोक जखमी झाले. असे म्हटले जाते की, सलमान दारूच्या नशेत गाडी चालवत होता. त्यानंतर त्याला अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले, पण नंतर त्याला जामीन मिळाला. 2015 मध्ये त्याला कनिष्ठ न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून मुक्तता केली. सलमान म्हणाला की, तो कार चालवत नव्हता, पण त्याचा ड्रायव्हर कार चालवत होता.

हेही वाचा :

Aryan Khan : ड्रग्स प्रकरण; शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पोहोचला तुरुंगात, समोर आले फोटो

Aryan Khan drug case | शाहरुखला तिसऱ्यांदा धक्का, आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला, आर्थर रोड जेलमध्ये रवानगी !

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.