Palak Tiwari | पलक तिवारी हिने इशाऱ्यामध्ये नाराजी केली जाहिर?, सलमान खान याच्याबद्दल केले मोठे भाष्य
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी ही लवकरच बाॅलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. विशेष म्हणजे सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात पलक महत्वाच्या भूमिकेत आहे. नेटकऱ्यांच्या निशाण्यावर पलक आहे.
मुंबई : श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. त्याचे कारणही तेवढेच खास आहे. कारण श्वेता तिवारी हिची मुलगी बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे सलमान खान (Salman Khan) याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये डेब्यू करण्याची सुवर्णसंधी ही पलक तिवारी हिला मिळालीये. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर पलक तिवारी ही आहे. गेल्या काही दिवसांपासून पलक तिवारी हिचे नाव सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) याच्यासोबत जोडले जात होते. मात्र, तिने इब्राहिम अली खान याच्यासोबत असलेल्या रिलेशनवर स्पष्ट सांगितले.
पलक तिवारी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्यावर टिका केली. इतकेच नाही तर काहींनी तर तो व्हिडीओ पाहून सलमान खान यालाच मोठा प्रश्न केला. एका युजर्सने पलक तिवारी हिच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, भाईजान हिला तुम्ही तुमच्या चित्रपटामध्ये कसे घेतले? दुसऱ्याने लिहिले की, ही चित्रपटात काम करणार यावर माझा विश्वासच नाही.
नुकताच पलक तिवारी हिने एक मुलाखत दिलीये, ज्यामुळे ती चर्चेत आलीये. या मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिने काही मोठे खुलासे देखील केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. मात्र, या ट्रेलरमध्ये पलक तिवारी हिची झलकही दिसली नाही.
यावर पलक तिवारी म्हटली की, मला माहिती आहे, तो सलमान खान याचा चित्रपट आहे. मला बघायला कोणीही येणार नाहीये, सर्वजण हे सलमान खान यालाच बघण्यासाठी येणार आहेत. मी ज्यावेळी हा चित्रपट साईन करत होते, त्याचवेळी मला माहिती होते मला बघायला कोणीही येणार नाहीये. मुळात म्हणजे या चित्रपटात मी असो किंवा नसो काहीच फरक पडत नाही.
किसी का भाई किसी की जान हा चित्रपट सलमान खान याचा आहे हे मला सुरूवातीपासून माहित होते. मला या चित्रपटात काम करायचे होते आणि मी ते केले म्हणून मी खूप जास्त आनंदी आहे. काही दिवसांपासून चर्चा होत्या की, ट्रेलरमध्ये आपली झलकही नसल्याने पलक तिवारी ही भाईजानवर नाराज आहे. मात्र, यावर आता पलक तिवारी हिने मोठे भाष्य केले आहे.