परेश रावल म्हणतायत ‘बाबूराव गणपतराव आपटे’ आता नको रे बाबा! ‘हेराफेरी 2’बाबत केले मोठे वक्तव्य…

बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांचे प्रसिद्ध पात्र ‘बाबूराव गणपतराव आपटे’ हे सर्वांच्याच आवडत्या पात्रांपैकी एक आहे. जिथे एकीकडे ‘हेरा फेरी’चे चाहते गुगलवर त्याचा तिसरा भाग कधी तयार होणार याची बातमी शोधत आहेत.

परेश रावल म्हणतायत ‘बाबूराव गणपतराव आपटे’ आता नको रे बाबा! ‘हेराफेरी 2’बाबत केले मोठे वक्तव्य...
Paresh Rawal
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 1:22 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांचे प्रसिद्ध पात्र ‘बाबूराव गणपतराव आपटे’ हे सर्वांच्याच आवडत्या पात्रांपैकी एक आहे. जिथे एकीकडे ‘हेरा फेरी’चे चाहते गुगलवर त्याचा तिसरा भाग कधी तयार होणार याची बातमी शोधत आहेत. तर दुसरीकडे, या फ्रँचायझीची सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारा परेश रावल आता या पात्रातून मुक्त झाल्याची चर्चा आहे. बाबुराव आपटे हे परेश रावल यांच्या सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध पात्रांपैकी एक आहे.

द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी ‘फिर हेरा फेरी’ दरम्यानचे त्यांचे अनुभव सांगितले. ते म्हणाले की हेरा फेरीच्या दुसर्‍या भागात पहिल्या चित्रपटा इतका निरागसपणा नव्हता. पुढे बोलताना ते म्हणाले की, सुनील शेट्टी हा या चित्रपटातील सर्वात प्रामाणिक व्यक्ती होता आणि म्हणूनच तो दुसऱ्या भागातही वेगळा दिसला होता.

मी कंटाळलो आता!

जेव्हा मुलाखतकाराने त्यांना विचारले की, सोशल मीडियावर या व्यक्तिरेखेवर बरेच मीम बनवले जातात. लोक एकमेकांना त्यांच्या संवादांचे व्हिडीओ पाठवण्यात आनंद मानतात, तेव्हा त्यांचे उत्तर होते की, मला आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे. हे सर्व आता तेच तेच असल्यासारखे वाटते. या चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘हेरा फेरीमध्ये जे काही घडले, त्यात आम्ही खूप निरागस होतो. दुसऱ्या भागात खूप हुशारी दाखवत होतो आणि तेच काम करत नव्हते.’

सुनील शेट्टीचे केले कौतुक

या मुलाखतीदरम्यान, परेश रावल सुनील शेट्टीच्या कामाचा संदर्भ देत म्हणाले की, ‘या सगळ्यात एक माणूस होता जो इतरांपेक्षा वेगळे काम करत होता, जो खूप प्रामाणिक होता, तो सुनील शेट्टी होता. त्याला कधीच काही सिद्ध करायचे नव्हते, त्यामुळे तो या सर्व गोष्टींपासून दूर होता. आणि आम्ही पाहत होतो, खूप गोंधळ झाला होता. यावेळी त्यांना या प्रसिद्ध फ्रँचायझीच्या तिसर्‍या भागाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले की, जेव्हाही असे होते तेव्हा एखाद्या पात्राला निरागसपणाची आवश्यकता असते, ती तिथे नव्हती… ती तिथे नव्हतीच. तिथेच चूक झाली. मात्र, आता सत्य हे आहे की मला आता या पात्रातून सुटका हवी आहे.

‘हेरा फेरी’ या चित्रपटात परेश रावलसोबत अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. 2000 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट कल्ट चित्रपटांच्या श्रेणीत गणला जातो. त्याचा दुसरा भाग ‘फिर हेरा फेरी’ नीरज वोहरा यांनी दिग्दर्शित केला होता, मात्र तो पहिल्या चित्रपटाइतका प्रभावी ठरला नव्हता.

हेही वाचा :

‘इर्शाद’ नव्हे ‘काव्य पहाट’, ‘No Bindi No Business’नंतर आता शेफाली वैद्यंचा मोर्चा संदीप खरे-वैभव जोशींच्या कार्यक्रमाकडे!

अनन्या पांडेने सुरु केले ‘लायगर’चे चित्रीकरण, ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यामुळे लागला होता ब्रेक!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.