Parineeti Chopra Weight Loss : परिणीती चोप्रा हिने कमी केलेलं वजन पाहून सगळेच होते हैराण, जाणून घ्या!

परिणीतीने एवढं वजन कसं कमी केलं असा प्रश्न बहुतेक लोकांना पडलाच असेल. तर आज आपण तिच्या जीवनशैली आणि काही सवयींबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही तिला फॉलो करून अपेक्षित परिणाम मिळवू शकता.

Parineeti Chopra Weight Loss : परिणीती चोप्रा हिने कमी केलेलं वजन पाहून सगळेच होते हैराण, जाणून घ्या!
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 10:30 PM

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राने आपचे खासदार राघव चड्ढा यांच्याशी 13 मे रोजी रात्री एंगेजमेंट केली. सध्था या क्यूट कपलच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच  परिणीतीने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे, मात्र परिणीतीला यासाठी मोठ्या परीक्षेला सामोरे जावं लागलं आहे. यामध्ये परिणीतीनं एकदा 28 किलोपर्यंत वजन कमी केलं होतं.

बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी परिणीती चोप्राचे वजन जास्त होते. परंतु तिनं तिची मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. चित्रपटासाठी तिनं मेहनत घेत तब्बल 28 किलो वजन कमी केलं होतं.

परिणीतीनं कसं केलंवजन कमी?

डाएट

हेल्दी फुड खाण्याची सवय लावल्याशिवाय तुम्ही फिटनेस मिळवू शकत नाही.  परिणीती चोप्राही खूप कडक डाएट रूटीन फॉलो करते. तिनं तिचं वजन कमी करताना स्वतःला जास्त चरबी, जास्त कार्ब आणि गोड पदार्थांपासून दूर ठेवले होते. विशेष म्हणजे ती पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज असे पदार्थ खात नाही.

हेल्दी ब्रेकफास्ट

परिणीतीनं हेल्दी ब्रेकफास्ट खाण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिली होती. तिनं तिच्या ब्रेकफास्टमध्ये ब्राऊन ब्रेड, बटर, अंडे, एक ग्लास दूध आणि ताज्या फळांचा रस या पदार्थांचा समावेश केला होता. हेल्दी ब्रेकफास्टमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हेल्दी लंच

परिणीती चोप्रा दुपारच्या जेवणात ब्राऊन राइस, रोटी, डाळ आणि हिरव्या पालेभाज्या अशा हेल्थी पदार्थांचा समावेश करते.  वजन नियंत्रणात राहण्यासाठी हलका आहार खूप प्रभावी ठरतो.

हेल्दी डिनर

परिणीती रात्री झोपण्याच्या 2 तास आधी डिनर करते.  ज्यामध्ये ती कमी तेलात बनवलेले अन्न, हिरव्या भाज्या आणि एक ग्लास दुध अशा हेल्थी पदार्थांचा समावेश करते.

वर्कआउटवर फोकस

आहारासोबतच परिणीती वर्कआउटवरही खूप लक्ष देते. अनेकदा तिला जिमच्या बाहेर स्पॉट केलं जातं. परिणीती तिच्या सोशल मीडियावर वर्कआउटचे बरेच व्हिडिओही शेअर करते. ती वर्कआउटसोबतच योगादेखील करते.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.