Indian Idol 12 | पवनदीप राजन आणि अरुणीता कांजीलालचे रोमँटिक गाणे ‘तेरी उम्मीद’ प्रेक्षकांच्या भेटीला!
गायक-संगीतकार हिमेश रेशमिया याने अलीकडेच 'हिमेश के दिल से' या अल्बममधील पवनदीप (Pawandeep Rajan) आणि अरुणीता (Arunita Kanjilal) यांचे बहुप्रतिक्षित ‘तेरी उम्मीद’ हे गाणे रिलीज करत चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे.
मुंबई : रॉकस्टार आणि भारताचा सुपरहिट गाण्यांचा किंग हिमेश रेशमिया याचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्याने चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. गायक-संगीतकार हिमेश रेशमिया याने अलीकडेच ‘हिमेश के दिल से’ या अल्बममधील पवनदीप (Pawandeep Rajan) आणि अरुणीता (Arunita Kanjilal) यांचे बहुप्रतिक्षित ‘तेरी उम्मीद’ हे गाणे रिलीज करत चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे.
प्रतिभावान गायक उबर यांनी गायलेले एक रोमँटिक गाणे, तेरी उम्मेद रसिकांच्या सर्वच निकषांवर सुपरहिट ठरते आहे. त्यांच्या म्युझिक अल्बममधील पवनदीप आणि अरुणीता यांनी गायिलेल्या शेवटच्या गाण्याचे जगभरातील संगीत रसिकांनी खूप कौतुक केले आहे आणि त्याच बरोबर रसिकांनी हिमेश रेशमिया यांचे देखील खूप कौतुक केले आहे. हे सुंदर गाणे एक स्टुडीओ व्हर्जन आहे, ज्यात गायकांनी अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केले आहे.
पाहा गाणे :
Happy birthday @realhimesh sir Thank you for this wonderful song “Terii Umeed” out now Link in Bio#himeshreshammiya #himeshkedilse #idolpawandeep #idolarunita @arunitakanjilal pic.twitter.com/10yYjKJm9s
— Pawandeep Rajan (@RajanPawandeep) July 23, 2021
नवोदित कलाकार असूनही पवनदीप आणि अरुणीता यांनी हे गाणे दिग्गजांप्रमाणे गायले आहे. ‘तेरे बीना’च्या सुपरहिट यशानंतर त्याची निर्मिती असलेले ‘तेरी उम्मीद’ ची प्रत्येक धून खूपच छान वाजवली आहे. ‘तेरी उम्मीद’ त्याच्या मखमली आवाजाची एक वेगळी श्रेणी सादर करते आणि त्याचे अष्टपैलुत्व देखील दर्शवते. गाण्याचे प्रकाशन झाल्यावर हिमेश म्हणाला की, ‘मला खात्री आहे की सर्व संगीत रसिकांना हे गाणे आवडेल.’
हिमेशचा धमाका!
2021मध्ये हिमेशने 65 दशलक्ष व्ह्यूज आणि 27 दशलक्ष ऑडिओ स्ट्रीम मिळवला. पवनदीप आणि अरुणीता कांजिलाल यांनी गायलेल्या मूड अल्बममधील ‘तेरे बीना’ ने 17 दशलक्ष व्ह्यू आणि 4 दशलक्ष ऑडिओ स्ट्रीमिंग मिळवला आहे आणि हिमेशच्या ‘दिल से’ अल्बममधील सवाई भट्टचा ‘सांसे’ने 37 दशलक्ष व्ह्यू आणि 4 दशलक्ष ऑडिओ स्ट्रीमिंग मिळवले आहे. तर, मोहम्मद दानिश यांनी गायलेल्या हिमेशच्या दिल से अल्बममधील ‘दगा’ या गाण्याने यूट्यूबवर 16 दशलक्ष व्ह्यू आणि 2 दशलक्ष ऑडिओ स्ट्रीमिंग मिळवले आहे. ही चारही गाणी सुपरहिट ठरली आहेत. तसेच प्रत्येक गाण्याचे ट्रेंडिंग दररोज वाढत आहे.
(Pawandeep Rajan and Arunita Kanjilal’s romantic song ‘Teri Umeed’ release)
हेही वाचा :
राज कुंद्राच्या सर्व कामांची माहिती आहे का? Shilpa Shetty ला पोलिसांनी विचारले 10 महत्त्वाचे प्रश्न
Bigg Boss OTT | सलमान खान नाही तर करण जोहर होस्ट करणार ‘बिग बॉस ओटीटी’, जाणून घ्या नेमकं काय बदलणार?