AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Payal Rohatgi: 12 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर पायल-संग्रामने बांधली लग्नगाठ, पहा फोटो

पायल आणि संग्राम यांची पहिली भेट 2011 मध्ये झाली. तर 2014 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. काही दिवसांपूर्वी पायल ही कंगना रनौतच्या लॉक अप या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती.

Payal Rohatgi: 12 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर पायल-संग्रामने बांधली लग्नगाठ, पहा फोटो
हिंदू विवाहपद्धतीनुसार पायल-संग्रामने लग्न (wedding) केलं असून या सोहळ्यात पायलने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता.Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 10:32 AM

अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) आणि कुस्तीपटू संग्राम सिंग (Sangram Singh) हे शनिवारी आग्रा इथं विवाहबद्ध झाले. हिंदू विवाहपद्धतीनुसार पायल-संग्रामने लग्न (wedding) केलं असून या सोहळ्यात पायलने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्यावर भरजरी दागिने आणि मिनिमल मेकअपसह असा तिचा ब्रायडल लूक होता. पायलने तिच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पायल आणि संग्राम लग्नाच्या विविध विधी करताना दिसत आहेत. पायल आणि संग्राम लग्नापूर्वी जवळपास 12 वर्षे एकमेकांना डेट करत होते. आग्रा याठिकाणी लग्नाच्या एक दिवस आधी पायल आणि संग्राम यांनी एका प्राचीन मंदिरात प्रार्थना केली. त्याआधी या जोडप्याने प्री-वेडिंग फंक्शन्सही केले होते. हळदीच्या कार्यक्रमात दोघांनी पिवळ्या रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते.

पायल आणि संग्राम यांची पहिली भेट 2011 मध्ये झाली. तर 2014 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. काही दिवसांपूर्वी पायल ही कंगना रनौतच्या लॉक अप या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये ती अनेकदा संग्रामबद्दल व्यक्त झाली. ती शोमध्ये असतानाच संग्रामने माध्यमांशी बोलताना त्यांच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. लग्नाची तारीख निश्चित झाल्याचं त्याने सांगितलं होतं.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो

पायलने फेमिना मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत भाग घेऊन करिअरची सुरुवात केली. नंतर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिस टुरिझम वर्ल्ड स्पर्धेत मिस इंडिया टुरिझम म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिथे पायलने सुपरमॉडेल मिस टुरिझम वर्ल्डचा किताब पटकावला. तिने आतापर्यंत बऱ्याच ब्रँड्सच्या जाहिरातीसुद्धा केल्या आहेत. 2002 मध्ये तिने ‘ये क्या हो रहा है’ या चित्रपटातून पदार्पण केलं. तर 2006 मध्ये ती ’36 चायना टाऊन’ या चित्रपटात झळकली. दुसरीकडे संग्राम सिंग हा भारतीय कुस्तीपटू, अभिनेता, मोटिव्हेशनल स्पीकर आणि हेल्थ गुरू आहे.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....