Preity Zinta | ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटाच्या घरी जुळ्यांचं आगमन, सरोगेसीद्वारे घेतला मातृत्वाचा आनंद!

अभिनेत्री प्रिती झिंटाने (Preity Zinta) एक गुड न्यूज दिली आहे, जी ऐकून सर्वांना भरपूर आनंद झाला आहे. प्रीती जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रितीने सोशल मीडियावर पती जेनसोबतचा एक फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे.

Preity Zinta | ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटाच्या घरी जुळ्यांचं आगमन, सरोगेसीद्वारे घेतला मातृत्वाचा आनंद!
Priety Zinta And Husband
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 1:29 PM

मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटाने (Preity Zinta) एक गुड न्यूज दिली आहे, जी ऐकून सर्वांना भरपूर आनंद झाला आहे. प्रीती जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रितीने सोशल मीडियावर पती जेनसोबतचा एक फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे. तिने लिहिले, ‘नमस्कार मित्रांनो, मला तुम्हा सर्वांसोबत एक चांगली बातमी शेअर करायची आहे. जेन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आमच्या आयुष्यात 2 नवीन आनंद आल्याने आमची मनं प्रेमाने भरलेली आहेत. आम्ही जय झिंटा-गुडइनफ आणि जिया झिंटा-गुडइनफ यांचे पालक झालो आहोत.’

प्रितीने पुढे लिहिले की, ‘आम्ही आमच्या आयुष्याचा हा नवीन प्रवास एकत्र जगण्यासाठी उत्सुक आहोत. डॉक्टर, परिचारिका आणि जे आमचे सरोगेट होते त्यांचे खूप आभार. जय, आणि जिया यांना खूप खूप प्रेम.’

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रितीच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव!

प्रीती आणि जेन यांचे 29 फेब्रुवारी 2016 रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर प्रीती पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहू लागली. लग्नानंतर प्रीतीने चित्रपटांपासून स्वतःला काहीसे दूर केले होते. ती फक्त कुटुंबासोबतच वेळ घालवत होती. त्यानंतर 2018 साली ती ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ आणि ‘भैयाजी सुपरहिट’ या 2 चित्रपटांमध्ये दिसली. दोन्ही चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

तेव्हापासून प्रीतीने कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. ती पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहू लागली. अनेकदा ती जेनीसोबतचे फोटो शेअर करत होती. कधी-कधी भारतात जाऊनही ती फिरायची. लॉकडाऊनमध्ये प्रीतीने जेनीसोबतचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ती चित्रपटांपासून दूर असली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी खूप संवाद साधत असे. याशिवाय ती आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आयपीएल सामन्यांमध्येही जात असे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

रिपोर्ट्सनुसार, प्रीती आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन देखील या चित्रपटात असणार आहेत. करण जोहर या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती करत आहे. जर ही बातमी खरी असेल तर प्रितीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा :

Mouni Roy | ब्लॅक बिकिनीमध्ये मौनी रॉयची बीचवर धमाल, अभिनेत्रीचा लूक चाहत्यांना लावतोय वेड!

लखनऊ कोर्टाने ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरीविरोधात जारी केला अटक वॉरंट, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

मी त्या देशातून येतो, जिथं दिवसा बायकांची पूजा केली जाते आणि रात्री रेप, वीर दासचा व्हिडीओ भडकाऊ की वास्तव?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.