AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियंकाने शेअर केलं निकसोबतच्या ‘यशस्वी’ लग्नाचं गुपित, अशा प्रकारे ठेवतात एकमेकांना आनंदी!

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांच्या लग्नाला दोन वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. दोघेही उदयपुरात विवाहबंधनात अडकले होते. हे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रीतिरिवाजांमध्ये पार पडले.

प्रियंकाने शेअर केलं निकसोबतच्या ‘यशस्वी’ लग्नाचं गुपित, अशा प्रकारे ठेवतात एकमेकांना आनंदी!
प्रियांका आणि निक जोनास
| Updated on: May 25, 2021 | 1:57 PM
Share

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांच्या लग्नाला दोन वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. दोघेही उदयपुरात विवाहबंधनात अडकले होते. हे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रीतिरिवाजांमध्ये पार पडले. प्रियंका आणि निकच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र सहभागी झाले होते. आता लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत आणि दोघेही नेहमी आनंदी दिसतात. प्रियांकाने आता तिच्या यशस्वी लग्नाचे रहस्य सर्वांसमोर उघड केले आहे. याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले आहे (Priyanka Chopra Share secrets of her happy relationship with nick Jonas).

व्होग ऑस्ट्रेलियाशी झालेल्या संभाषणात जेव्हा प्रियंकाला तिच्या यशस्वी लग्नाचे रहस्य विचारले गेले तेव्हा ती म्हणाली, ‘आताशी आमच्या लग्नाला दोनच वर्षे झाली आहेत, तेव्हा मी तुम्हाला थोडेसंच सांगू शकते. माझ्या मते, आमच्यातील संभाषण म्हणजे एकत्र बसून एकमेकांशी बोलणे आणि एकमेकांचे ऐकणे आहे. जेव्हा आपण एकत्र वेळ घालवता, तेव्हा आपल्याला हे आवडते आणि आपण त्याचा आनंद घेता.’

लग्नाच्या नियोजनाबद्दल सांगताना म्हणाली…

प्रियंका म्हणाली की, जगातील सगळ्यात सुंदर लग्न सोहळा नियोजन करायला तब्बल दोन महिने लागले. कारण आमच्याकडे विचार करायला जास्त वेळ मिळाला नाही. या वेळी जे काही घडले ते पूर्णपणे परिपूर्ण होते.

प्रियंका आणि निक डेटिंग करण्यापूर्वी ट्विटरवरून एकमेकांशी गप्पा मारायचे. त्यानंतर दोघांनीही मेसेजच्या माध्यमातून बोलण्यास सुरुवात केली. व्हॅनिटी फेअर ऑस्करनंतर प्रियांका आणि निक 2017मध्ये पहिल्यांदाच भेटले होते. त्यानंतर, दोघांची लॉस एंजेलिसमध्ये भेट झाली, जिथे त्यांनी ब्युटी आणि बीस्ट हा चित्रपट एकत्र पाहिला (Priyanka Chopra Share secrets of her happy relationship with nick Jonas).

नवऱ्याचा भक्कम आधार

नुकतेच निक जोनास याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सेटवर निकला दुखापत झाली, ज्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. बिलबोर्ड्स पुरस्कार सोहळ्यात निकला सूत्रसंचालन कातायचे होते. मात्र, त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे प्रियंकाने देखील त्याला पाठिंबा दर्शवला आणि त्याच्याबरोबर हा शोही केला. प्रियंकाने निकसोबत एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करुन त्याचे कौतुक केले होते. फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले, ‘पतीच्या कौतुकासाठी पोस्ट. अगदी बरगडीची दुखापत देखील त्याला थांबवू शकत नाही. तुला जे वाटते, ते तू करतोस त्याचा मला अभिमान आहे. तू मला रोज प्रेरणा देतोस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.’

(Priyanka Chopra Share secrets of her happy relationship with nick Jonas)

हेही वाचा :

भारतीयांच्या भावनांचा आदर, सलमानने चित्रपटातून वगळले, ‘या’ प्रकरणामुळे संपलं राहत फतेह अली खान यांचं करिअर!

पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला, नंतर अचानक गायब झाली रणबीरची अभिनेत्री, जीवघेण्या आजाराशीही दिली होती झुंज!  

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.