Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Puneeth Rajkumar Death | पुनीत राजकुमारच्या निधानामुळे दुःखी चाहते रस्त्यावर, कर्नाटकात कलम 144 लागू!

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar ) यांचे वयाच्या 46व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे.

Puneeth Rajkumar Death | पुनीत राजकुमारच्या निधानामुळे दुःखी चाहते रस्त्यावर, कर्नाटकात कलम 144 लागू!
Puneeth Rajkumar
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 4:47 PM

मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar ) यांचे वयाच्या 46व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुनीतच्या मृत्यूनंतर कर्नाटक राज्यात सर्व चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. ही बातमी कळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेही पुनीतला पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुनीत यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले की, ‘डॉ राजकुमार यांचा मुलगा पुनीत राजकुमार यांचा तरुण वयात झालेला मृत्यू हा धक्का बसण्यापेक्षा कमी नाही. मी वैयक्तिकरित्या एक जवळचा मित्र गमावला आहे. त्यांचा उत्साह, त्यांची प्रतिभा, त्यांचे अनेक उत्कृष्ट चित्रपट, कन्नडचे सांस्कृतिक दूत म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व मी विसरू शकत नाही’.

कलाकारांकडूनही श्रद्धांजली

आर माधवन यांनी शोक व्यक्त करताना लिहिले की, ‘सर्वात दयाळू, प्रेमळ आणि उदात्त आत्म्यांपैकी एक गेला. मला खूप धक्का बसला आहे, भाऊ, आमची मनं मोडून आणि गोंधळात टाकून तुम्ही आम्हा सर्वांना सोडून गेलात. आज स्वर्ग उजळून निघाला आहे. मला अजूनही असं वाटत आहे की, हे खरे नाही.’

अभिनेता सिद्धार्थने लिहिले की, ‘पुनीत, तू आम्हाला सोडून गेला आहेस यावर माझा विश्वास बसत नाहीय. दयाळू, प्रतिभावान, निर्भय… तू या जगाला खूप काही दिलेस. हे ठीक नाही झालं भावा.’

क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने ट्विट केले की, पुनीत राजकुमारच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. किती उदार आणि सभ्य व्यक्तीमत्त्व, त्यांचे जाणे भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

अभिनेता पुनीत राजकुमार हा 46 वर्षांचा होता. तो ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचा मुलगा होता. पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1985 मध्ये तो ‘बेट्टाडा होवू’ चित्रपटात दिसला होता. या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले. यासोबतच त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘सुवरत्थान’ या चित्रपटात तो अखेरचा दिसला होता. याच चित्रपटासाठी त्याची खूप वाहवा झाली होती. ‘सुवरत्थान’ या चित्रपट यंदाच्या वर्षी प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा :

World Heart Day 2021 : हृदयविकाराचा झटका जीवघेणाच, सिद्धार्थ शुक्लापासून ‘या’ कलाकारांचा ऐन तारुण्यात मृत्यू

Sidnaaz : सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्याचा प्रचंड धक्का; शहनाजला दु:ख आवरेना

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.