Pushpa BO Collection : ‘पुष्पा’चा दमदार तिसरा आठवडा, अजूनही बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवतोय अल्लू अर्जुनचा चित्रपट!
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर सुपरहिट चित्रपट 'पुष्पा'ने (Pushpa) सर्वत्र आपला झेंडा रोवला आहे. साऊथचा स्टार अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाला हिंदी पट्ट्यातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने कमाई करण्यात गुंतला आहे.
मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा’ने (Pushpa) सर्वत्र आपला झेंडा रोवला आहे. साऊथचा स्टार अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाला हिंदी पट्ट्यातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने कमाई करण्यात गुंतला आहे. 3 आठवडे पडद्यावर आसलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने वर्ल्डवाइड 300 कोटींचे कलेक्शन केले आहे.
त्याचबरोबर आता ‘पुष्पा’ हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 7 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदन्ना स्टारर चित्रपट ‘पुष्पा’ 17 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची छप्परफाड कमाई
‘पुष्पा’ हा चित्रपट जगभरात 5 भाषांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाला अजूनही ‘वर्ड ऑफ माऊथ’चा फायदा मिळत आहे, चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक ‘पुष्पा’चे सर्वत्र कौतुक करत आहेत. तरण आदर्शने आपल्या ताज्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘पुष्पा’, जो आता तिसऱ्या आठवड्यात आहे, तो हिंदीतही धुमाकूळ घालत आहे. सुपर्ब ट्रेंडिंग – पहिल्या आठवड्यात चित्रपटाची कमाई – 26.89 कोटी, दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 20.20 कोटींची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाचे कलेक्शन होते – 212.10 कोटी रुपये (5 दिवस).’
हिंदीव्यतिरिक्त ‘पुष्पा’ गुजरात आणि महाराष्ट्रातही गाजला!
तरण आदर्शने असेही सांगितले की, दक्षिणेचा हा धमाका हिंदी पट्ट्यात चमकदार कामगिरी करत आहे, तर गुजरात आणि महाराष्ट्रातही तो खूप पसंत केला जात आहे. आकडे शेअर करताना तरण आदर्शने लिहिले की,’विशेषतः महाराष्ट्रात चित्रपटाला खूप प्रेम मिळत आहे. तिसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी चित्रपटाने 3.50 कोटींची कमाई केली, तर शनिवारी चित्रपटाने 6.10 कोटींची कमाई केली. रविवारी चित्रपटाने 6.25 कोटींची कमाई केली, तर सोमवारी चित्रपटाने 2.75 कोटींची कमाई केली. मंगळवारी या चित्रपटाने 2.50 कोटींची कमाई केली. चित्रपटाची आठवड्याभरातील एकूण कमाई – 68.19 कोटी रुपये.’
या चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने अभिनेता यशचा चित्रपट ‘केजीएफ’लाही मागे टाकले आहे.