Raj Kundra Case | गुन्हे शाखेची राज कुंद्रावर कडक कारवाई, वेगवेगळ्या खात्यातील 7 कोटींपेक्षा अधिक रक्कम फ्रीज!

प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लील चित्रपट प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत सुमारे 7 कोटी 31 लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे. ही रक्कम वेगवेगळ्या बँकांमध्ये गोठवली गेली आहे.

Raj Kundra Case | गुन्हे शाखेची राज कुंद्रावर कडक कारवाई, वेगवेगळ्या खात्यातील 7 कोटींपेक्षा अधिक रक्कम फ्रीज!
राज कुंद्रा
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 11:37 AM

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लील चित्रपट प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत सुमारे 7 कोटी 31 लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे. ही रक्कम वेगवेगळ्या बँकांमध्ये गोठवली गेली आहे. यास्मीन खान उर्फ ​​रोआ खानच्या खात्यातील 34 लाख 90 हजार रुपये गुन्हे शाखेने गोठवले आहेत. यास्मीन खानच्या Hothit App खात्यात ही रक्कम गोठवली गेली आहे. यासह, दीपंकर उर्फ ​​शान, गहाना वशिष्ठ, उमेश कामत यांच्या दोन बँक खात्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेने दिपंकर उर्फ ​​शानच्या दोन खात्यांमधून 1 लाख 20 हजार रुपये गोठवले आहेत. त्याचबरोबर गहना वशिष्ठच्या तीन बँक खात्यांमधून सुमारे 36 लाख रुपये जप्त केले आहेत. उमेश कामत यांच्या दोन बँक खात्यांमधून 6 हजार रुपये गोठविण्यात आले आहेत. तनवारी हाशमीच्या दोन बँक खात्यांमधून सहा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. अरविंद नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यातून सुमारे 1 कोटी 81 लाख रुपये जप्त केले आहेत.

गुन्हे शाखेने फ्रीज केले कोट्यावधी रुपये

कानपूरमधील हर्षिता श्रीवास्तव यांच्या खात्यातील 2 कोटी 32 लाख रुपये गोठवले गेले आहेत. यासह कानपूरमध्येच नरबाडा श्रीवास्तव यांच्या बँक खात्यात 5 लाख 59 हजार रुपये गोठवण्यात आले आहेत. यासह फ्लिझ मूव्हीज ओपीसी प्रा. लि. भोपाळ आणि फ्लिझ मूव्हीजच्या बँक खात्यात 30 लाख 87 हजार रुपये ओपीसी प्रा. लि. भोपाळ बँक खात्यात 1 कोटी 28 लाख रुपयांच्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत.

मुंबई क्राइम ब्रँचची कडक कारवाई

मेरठमध्येही फ्लिझ मूव्हीज ओपीसी प्रा. लि. च्या बँक खात्यात 73 लाख 87 हजार रुपये गोठवले गेले आहेत, ही कडक कारवाई गुन्हे शाखेने केली आहे. या रॅकेटशी संबंधित सर्व बँक खात्यांमधील मोठ्या प्रमाणात व्यवहारांची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. आता या खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट केले जात आहे. जेणेकरून आपल्याला त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. राज कुंद्रा यांचे मेहुणे प्रदीप बक्षी यांच्यावर गुन्हे शाखाही कडक कारवाई करीत आहे. त्याला ‘वाँटेड’ आरोपी म्हणून घोषित केले आहे. प्रदीप बक्षी केनरीन कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

(Raj Kundra Case Mumbai crime branch freeze 7 crore from different accounts)

हेही वाचा :

राज कुंद्राच्या अटकेनंतर पत्नी शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मधून बाहेर?, सेटवर गैर हजेरीमुळे चर्चांना उधाण!

Raj Kundra Case | ‘हॉट-शॉट’ गुगल प्लेस्टोरवर आणण्याची तयारी, अडचणी आल्यास काय करणार? पाहा राज कुंद्राचा ‘प्लॅन-बी’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.