Raj Kundra Case Update : सचिन वाझेंमुळे राज कुंद्राची अटक पाच महिन्यांपासून लांबणीवर, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

अँटिलिया आणि मनसुख हिरेनच्या बाबतीत मुंबई गुन्हे शाखेला खूप त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त बदलण्यात आले. नवीन आयुक्त येताच अनेक बदल करण्यात आले.

Raj Kundra Case Update : सचिन वाझेंमुळे राज कुंद्राची अटक पाच महिन्यांपासून लांबणीवर, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
राज कुंद्रा
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 11:35 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्याबद्दल आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच राज कुंद्राच्या अटकेची तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण सचिन वाझे (Sachin Waze) प्रकरणामुळे, त्यावेळी राजच्या अटकेची कारवाई लांबणीवर पडत होती. खरं तर, अंबानीच्या घरापासून काही अंतरावर जिलेटिनच्या काड्या सापडल्यामुळे पोलिसांचं पूर्ण लक्ष या प्रकरणाकडे वळलं होतं.

अँटिलिया आणि मनसुख हिरेनच्या बाबतीत मुंबई गुन्हे शाखेला खूप त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त बदलण्यात आले. नवीन आयुक्त येताच अनेक बदल करण्यात आले. नवीन आयुक्तांनी पदभार स्वीकारताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची बदली झाली. राज कुंद्राच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली झाली.

राज कुंद्राच्या अटकेला 5 महिने लागले

मुंबई पोलिसांच्या झालेल्या बदलीमुळे साक्षीदार आणि पुरावे असूनही राज कुंद्राला अटक करण्यास जवळपास 5 महिने लागले. अश्लील चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा यांना एस्प्लानेड कोर्टाने 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी क्राइम ब्रांचची टीम त्याला भायखळा तुरुंगात नेत असताना, तो निराश दिसला होता.

पहिली तक्रार 4 फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली!

या दरम्यान राज कुंद्रा यांनी प्रश्नांची उत्तरेदेखील दिली नाहीत. मुंबई पोलिस अनेकवेळा भायखळा येथे आरोपींना ठेवतात आणि येथूनच त्यांची चौकशी केली जाते. 4 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात प्रथम तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी इतका वेळ का घालवला, असा प्रश्न उपस्थित होत होता. लवकरच राज कुंद्रा यांचे संपूर्ण व्यवसायाचे मॉडेल समोर येणार आहे, ज्यामुळे आपला ‘गुप्त धंदा’ लपवण्यासाठी तो काय काय करायचा, हे देखील स्पष्ट होईल.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.

(Raj Kundra Case Update Raj Kundra’s arrest postponed for five months due to Sachin Waze case)

हेही वाचा :

Raj Kundra Controversy : बिटकॉईन घोटाळ्यापासून ते आयपीएल मॅच फिक्सिंगपर्यंत, राज कुंद्राभोवती नेहमीच वादाचं वलय!

Raj Kundra case : मुंबई ते लंडन चालणाऱ्या अश्लील चित्रपट रॅकेटची संपूर्ण माहिती, राज कुंद्राच्या आयटी हेडला अटक

Raj Kundra case : 30-40 अ‍ॅप्स, शेकडो अश्लील व्हिडीओ, भलं मोठं भांडार मुंबई पोलिसांच्या हाती, राज कुंद्रांचा पाय खोलात 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.